Next
‘जेएसपीएम’च्या विद्यार्थ्यांनी बनवली इलेक्ट्रिकल सायकल
प्रेस रिलीज
Thursday, July 11, 2019 | 04:18 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ताथवडे येथील जेएसपीएम संचालित राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या यांत्रिकी अभियांत्रिकी विभागातील निहील इनामदार व कुणाल मोरे या अभियांत्रिकी शाखेतील शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी अनोखी इलेक्ट्रिकल सायकल तयार केली आहे. 

इंधनाचे वाढते दर व वाहनांमुळे पर्यावरणाचे होणारे नुकसान यावर उपाय म्हणून ही सायकल त्यांनी बनवली आहे. ही सायकल तयार करण्यासाठी त्यांनी २४ होल्टची बॅटरी वापरली असून, एकदा चार्ज केल्यानंतर ती साधारण १८ ते २० किलोमीटरपर्यंत वापरता येते, अशी माहिती मार्गदर्शक प्रा. नितीन जाधव यांनी दिली; तसेच सायकलमध्ये असणाऱ्या डायनामोमुळे चाकाची ऊर्जा वापरून पुन्हा बॅटरी चार्ज करता येते, अशी व्यवस्था यात करण्यात आली असल्याचे विभागप्रमुख डॉ. अविनाश बडदे यांनी सांगितले. 

ही सायकल बनवण्यासाठी सुरुवातीला सरासरी १० हजार रुपये इतका खर्च आला; मात्र या सायकलची मोठ्या प्रमाणात निर्मिती केल्यास हा खर्च सात ते आठ हजारांवर  येऊ शकतो, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. या सायकलमुळे पैशाची बचत, पर्यावरणाचे संवर्धन व शारीरिक व्यायाम असे फायदे होणार आहे. 

विद्यार्थ्यांच्या या अभिनव उपक्रमाबद्दल ‘जेएसपीएम’चे संस्थापक सचिव डॉ. तानाजी सावंत, प्राचार्य डॉ. आर. के. जैन, उपप्राचार्य प्रा. अविनाश देवस्थळी, प्रा. रवी सावंत व प्रा. सुधीर भिलारे यांनी त्यांचे अभिनंदन केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
karan gupta About 62 Days ago
great work! good to see the young generation working so hard, keep it up
0
0

Select Language
Share Link
 
Search