Next
बोरगडी तांडा येथील रस्त्याचे सात मार्चला भूमिपूजन
रस्त्याच्या मागणीसाठी ऑडिओ ब्रिजद्वारे थेट मुख्यमंत्र्यांशी साधला होता संवाद
नागेश शिंदे
Wednesday, March 06, 2019 | 04:55 PM
15 0 0
Share this story

हिमायतनगर : ‘स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही मौजे बोरगडी ते बोरगडी तांडा एक व दोन यांना जोडणारा रस्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निधीतून मंजूर झाला असून, या रस्त्याचा भूमिपूजन सोहळा सात मार्च २०१९ रोजी हदगाव-हिमायतनगर मतदारसंघाचे आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या हस्ते होणार आहे,’ अशी माहिती शिवसेना तालुका संघटक संजय काईतवाड यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.

नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील मौजे बोरगडी ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या बोरगडी तांडा क्रमांक एक व दोन यांना जोडणारा रस्ता स्वातंत्र्य काळापासून आजपर्यंत झाला नव्हता. या रस्त्याची अंदाजे लांबी ३.५ किलोमीटर आहे. नदीकाठावर असलेल्या या दोन्ही तांड्याना जाण्यासाठी पक्के रस्ता नसल्याने वस्तीतील एक हजार नागरिक व शालेय विद्यार्थ्यांना पावसाळ्यात चिखलाचा, तर उन्हाळ्यात खड्डेमय रस्त्याचा सामना करावा लागत होता. पर्यायी रस्ता नसल्याने दळणवळणाचाही प्रश्न गंभीर बनला होता. या समस्येकडे लक्ष देऊन तत्काळ पक्का रस्ता करून द्यावा, अशी मागणी पाच नोव्हेंबर २०१६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी ऑडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तत्कालीन तहसीलदार गजानन शिंदे यांच्या उपस्थितीत काईतवाड यांनी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एक कोटी १५ लाखांचा निधी या रस्त्यासाठी मंजूर केला.

त्यानंतर बोरगडी येथे आमदार पाटील यांनी २५/१५ अंतर्गत १० लाखांचा निधी दिला असून, येथील मुख्यमंत्री ग्रामसडक रस्त्याचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न केले. या दोन्ही रस्त्यांचा भूमिपूजन सात मार्चला होणार आहे. या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link