Next
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे लोकसभेची पहिली यादी जाहीर
प्रेस रिलीज
Thursday, March 14, 2019 | 05:37 PM
15 0 0
Share this article:मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकसभा उमेदवारांची १२ जणांची पहिली यादी आज (१४ मार्च) प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली.

काँग्रेस पक्षाने बुधवारी आपली यादी जाहीर केली होती, त्यामध्ये महाराष्ट्रातील पाच जणांचा समावेश होता. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये सुनील तटकरे (रायगड), सुप्रिया सुळे (बारामती), उदयनराजे भोसले (सातारा), धनंजय महाडिक (कोल्हापूर), राजेंद्र शिंगणे (बुलढाणा), गुलाबराव देवकर (जळगाव), राजेश वीटेकर (परभणी), संजय दिना पाटील (मुंबई उत्तर पूर्व), आनंद परांजपे (ठाणे), बाबाजी पाटील (कल्याण), मोहम्मद फैजल (लक्षद्वीप) आणि हातकणंगलेमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पाठींबा दिला आहे.‘उर्वरित उमेदवारांची यादी उद्या आणि परवा जाहीर करण्यात येईल. बीड, अहमदनगर उमेदवारांबाबत चर्चा झाली आहे. लवकरच हीसुद्धा नावे जाहीर केली जातील. गडाख यांची उमेदवारी जाहीर करून काम केले होते. त्यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वडिलांचा पराभव केला होता. ही जुनी घटना पवार साहेबांनी सांगितली. त्यामुळे पवारसाहेबांनी कुणाचा अपमान केलेला नाही,’ असे पाटील यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेला प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांच्यासह राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार हेमंत टकले उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search