Next
मोहित टाकळकर चित्रपट दिग्दर्शनात
नात्यांची गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’
BOI
Friday, May 10, 2019 | 05:27 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : मराठी, हिंदी, उर्दू, कन्नड रंगभूमीवरील आघाडीचा दिग्दर्शक मोहित टाकळकर आता चित्रपट दिग्दर्शनासाठी सज्ज झाला असून, ‘मीडियम स्पाइसी’ या चित्रपटाच्या माध्यमातून तो मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. एक उत्तम संकलक म्हणूनही त्याची ओळख आहे. 

विधि कासलीवाल यांची निर्मिती असलेला हा चित्रपट नात्यांची लज्जतदार गुंफण खुसखुशीत पद्धतीने मांडणार आहे. लोकांना चवदार, लज्जतदार खायला आवडते; मात्र ते ‘मीडियम स्पाइसी’ असायला हवे अशी त्यांची अपेक्षा असते. नात्यांचेही असेच आहे. विविध बाबींमध्ये आपण नेहमीच मध्यममार्ग म्हणजेच ‘मीडियम’ला प्राधान्य देतो. अशाच आवडी-निवडी आणि सवयींबद्दल खुसखुशीत भाष्य करणारा हा चित्रपट आहे. लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत या मराठी चित्रपटाचे शुटिंग लवकरच सुरू होत असून, यात अभिनेत्री सई ताम्हणकर, पर्ण पेठे आणि ललित प्रभाकर अशी हटके स्टारकास्ट आहे. ‘लव्ह सोनिया’, ‘डेट विथ सई’ नंतर सई एका वेगळ्या भूमिकेत दिसेल. ‘आनंदी गोपाळ’ मधून प्रेक्षकांची मने जिंकणारा ललित शहरी युवकाची व्यक्तीरेखा साकारणार आहे. पर्णचाही एक वेगळा अंदाज या चित्रपटात दिसणार आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search