Next
रहस्यमय इजिप्तचा शोध
BOI
Thursday, December 20, 2018 | 10:05 AM
15 0 0
Share this story

इजिप्त हे प्राचीन शहरांपैकी एक मानले जाते. नाईल नदी, ग्रेट पिरॅमिड्स व स्फिंक्स ही येथील जगप्रसिद्ध पर्यटनस्थळे आहेत. पिरॅमिडबद्दल तर गूढ कुतूहल असते. इजिप्तच्या अशा गूढ चेहऱ्यापर्यंत पोचून त्याचे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न पॉल ब्रन्टन यांनी ‘रहस्यमय इजिप्तचा शोध’मधून केला आहे. तेथील गुढात्मक मंदिरे आणि देवता यांचे आध्यात्मिक महत्त्व यांचा धांडोळा घेताना ग्रेट पिरॅमिडमध्ये एकट्याने घालविलेल्या रात्रीचे वर्णनही केले आहे.

इजिप्तमधील विविध पैलूंची ओळख करून देणे आणि मन-शरीर नात्याच्या भोवती मुख्यत्वे गुंफण करणे हा लेखकाचा हेतू आहे. स्फिंक्सच्या सहवासात रात्र घालविताना त्यांना जो वेगळा अनुभव आला त्यातून स्फिंक्सचे मरुस्थळाचा संरक्षक म्हणून दर्शन घडते. वाळवंटात येणाऱ्या वेगवान वादळामुळे वाळूत अडकलेल्या स्फिंक्सला बाहेर काढण्याच्या प्रयत्नांबद्दल त्यांनी माहिती दिली आहे. इजिप्तमधील दुसरे नवल म्हणजे पिरॅमिड्स. त्यातही लेखकाने भटकंती केली व त्याचा पूर्ण वेगळा अनुभवही यात कथन केला आहे. याचा मराठी अनुवाद डॉ. सुरुची पांडे यांनी केला आहे.      

पुस्तक : रहस्यमय इजिप्तचा शोध
लेखक : पॉल ब्रन्टन
अनुवादक : डॉ. सुरुची पांडे
प्रकाशक : वॉव पब्लिशिंग्ज् प्रा. लि.
पाने : ३६८
किंमत : ३७५ रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link