Next
‘डान्स सीझन’अंतर्गत रंगली ‘नृत्यसंध्या’
प्रेस रिलीज
Tuesday, April 23, 2019 | 04:14 PM
15 0 0
Share this article:


पुणे : शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्था या संस्थेच्या माध्यमातून या वर्षी प्रथमच सुरू करण्यात आलेल्या ‘डान्स सीझन २०१९’ या उपक्रमांतर्गत शहरातील विविध भागांत नृत्यविषयक हे उपक्रम होत असून, ‘नृत्यसंध्या’ या कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन केले होते.

सुचित्रा दाते यांच्या नृत्यप्रेरणा इंटरनॅशनल स्कूल ऑफ भरतनाट्यम् या संस्थेतर्फे पर्वती पायथा येथील मित्र मंडळ कॉलनीमधील नृत्य प्रेरणा अंगण मंच येथे हा कार्यक्रम झाला. या वेळी जागतिक नृत्य दिवस आणि नृत्यप्रेरणा इंटरनॅशनल स्कूल ऑफ भरतनाट्यम् संस्थेला ३५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजित केला होता. या वेळी संस्थेच्या वरिष्ठ नृत्यांगना नृपा सोमण, श्रुती टेकवडे, धनश्री पंडित, कल्याणी देशपांडे, श्रद्धा पळसुले, तृषा अरु आणि अंबिका करंदीकर यांनी नृत्यसादरीकरण केले. याबरोबरच या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या निथी नायर यांनी मोहिणीअट्टमची प्रस्तुती केली. 


नृपा सोमण यांनी ओडिसीचे सादरीकरण केले. यामध्ये घरापासून सूर असलेल्या सैनिकाच्या कुटुंबियांची अवस्था त्यांनी आपल्या नृत्याच्या माध्यमातून प्रस्तुत केली. या प्रसंगी त्यांनी काही जावळी, पद्म यांचेदेखील सादरीकरण केले. त्यानंतर निथी नायर यांनी मोहिणीअट्टममध्ये वात्सल्य रसाचे सादरीकरण करीत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांनी काही तिल्लानादेखील सादर केले.

तृषा अरु आणि अंबिका करंदीकर यांनी नुकत्याच झालेल्या हनुमान जयंतीचे औचित्य साधत हनुमान चालीसाचे सादरीकरण केले. कल्याणी देशपांडे आणि श्रद्धा पळसुले यांनी आपल्या नृत्याच्या माध्यमातून नृत्यप्रेरणा संस्थेच्या ३५ वर्षांचा प्रवास मांडला. श्रुती आणि धनश्री यांनीही जावळी सादर करीत आपली नृत्यसेवा सादर केली.  

३० एप्रिलपर्यंत या ‘डान्स सीझन २०१९’चे औचित्य साधत शहरातील विविध ठिकाणी अनेकविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, भारतातीय शास्त्रीय कलेच्या सर्व शैलीतील कलाकार या निमित्ताने एकत्र येत आंतरराष्ट्रीय नृत्य दिवसाचे औचित्य साधत हा दहा दिवसांचा कार्यक्रम करणार आहेत. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search