Next
‘भाजप महामेळाव्यास हजारोंची उपस्थिती’
प्रेस रिलीज
Thursday, March 22 | 04:33 PM
15 0 0
Share this story



मुंबई : ‘भारतीय जनता पक्ष (भाजप) अनूसूचित जाती मोर्चा प्रदेशतर्फे आयोजित महामेळाव्याला पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाचे सुमारे २५ हजारांहून अधिक पदाधिकारी उपस्थित राहतील,’ असे मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुभाष पारधी यांनी सांगितले.

‘भाजप’ अनूसूचित जाती मोर्चा प्रदेश कार्यकारणी व जिल्हाध्यक्ष यांची सहा एप्रिल पक्ष स्थापना दिनाविषयी विशेष बैठक मुंबई येथे झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अनूसूचित जाती मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष सुभाष पारधी होते.

सहा एप्रिल स्थापना दिनाचे औचित्य साधून सहा एप्रिलला  मुंबई येथे भव्य महाभाजप महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास अनुसूचित जाती मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्रात पक्ष पातळीवर काम करणारे मोर्चाचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित रहावेत, यासाठी प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला.

विविध शहरांतून हजारोंच्या संख्येने मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्षांनी दिली; तसेच सर्व जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीबद्दल सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रदेश उपाध्यक्ष डॉ. मिलिंद शेजवळ, श्रावण इंगळे, बाबूराव नरवडे, रघुवीर तुरेकर, मोहन माने, शशिकांत राज यांनी या वेळी मार्गदर्शन केले.

स्वागत आणि प्रास्ताविक प्रदेश सरचिटणीस सुखदेव अडागळे यांनी केले. सरचिटणीस चंद्रकांत हिरवळे यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link