Next
‘अंगणवाडी केंद्राची संख्या वाढविणार’
प्रेस रिलीज
Friday, July 28, 2017 | 12:35 PM
15 0 0
Share this article:

वर्धा : ‘वर्धा जिल्ह्यासह अनेक ठिकाणी नवी अंगणवाडी केंद्रे स्थापन करण्याबाबत राज्य सरकार कार्यरत आहे. राज्य सरकारांना एक डिसेंबर २०१४च्या पत्रानुसार अंगणवाडी केंद्रे पुनश्च सुरू करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे,’ अशी माहिती महिला व बालकल्याण मंत्री मेनका गांधी यांनी लेखी उत्तरातून खासदार रामदास तडस यांना दिली.

वर्धा जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अंगणावाडी केंद्रे कधी स्थापन होणार, तसेच अंगणवाडी केंद्रांना नवीन रूप देण्याकरिता काय उपाययोजना आहे, असा तारांकित प्रश्न खासदार रामदास तडस यांनी संसदेत विचारला होता. (त्यांनी उपस्थित केलेला तो ९०वा प्रश्न होता.) या प्रश्नाला उत्तर देताना गांधी यांनी स्पष्ट केले, की सद्यस्थितीत महाराष्ट्र राज्यामध्ये एक लाख १० हजार ४८६ अंगणवाडी केंद्रे असून, त्यातील एक लाख नऊ हजार २५६ केंद्रे कार्यरत आहेत. १२वी पंचवार्षिक योजना ३१ मार्चला समाप्त झाली. या योजनेला एक सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. राज्य सरकारांना एक डिसेंबर २०१४च्या पत्रानुसार अंगणवाडी केंद्र पुनश्च सुरू करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे.

‘अंगणवाडी केंद्रे स्थापन करण्याकरिता, तसेच अस्तित्वात असलेल्या अंगणवाड्यांचा विकास करण्याच्या उद्देशाने हा प्रश्न संसदेत उपस्थित करण्यात आला होता. या माध्यमातून वर्धा लोकसभा मतदारसंघात अंगणवाडी विकासाकरिता नक्कीच फायदा होईल,’ असा विश्वास खासदार तडस यांनी व्यक्त केला.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search