Next
‘मी शेतकरी बोलतोय’
BOI
Thursday, June 01, 2017 | 10:37 AM
15 0 0
Share this article:

नाशिक : ‘मी शेतकरी बोलतोय’ हा संवादरूपी प्रयोग सादर करून बालशाहीर करण मुसळे याने नाशिकच्या बाजार समितीच्या आवारात मखमलाबाद येथे शेतकऱ्यांच्या एक जूनपासून होणाऱ्या शेतकरी संपात सहभागी होण्याचे आवाहन केले. या संवादरूपी भाषणातून शिवकार्य गडकोट संस्थेचा बालशाहीर करण व शेतकरी वाचवा अभियानाचे प्रबोधनप्रमुख ह. भ. प. प्रकाश चव्हाण यांनी संतांचे अभंग गाऊन, शेतकरी काव्यातून शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या संपात सहभागी होण्याची साद घातली.

येत्या एक जूनपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत शेतकरी संपावर जाणार आहेत. शेतीमाल आणि कृषिजन्य उत्पादने बारात नेली जाणार नाहीत. सरकारविरोधात असहकार पुकारण्याच्या हेतूने शेतकरी संपाची तयारी सुरू आहे. शेतकरी वाचवा अभियानाने गावोगावी शेतकरी सभा, गावसभा, चावडीसभा सुरू केल्या आहेत. ज्येष्ठ पत्रकार राम खुर्दळ लिखित ‘मी शेतकरी बोलतोय’ या विषयावर बालशाहीर करण मुसळे याने शेतकरीपात्र हरीच्या माध्यमातून नाशिकच्या बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांच्या आयुष्यातील यातना मांडल्या. ‘आता मरायचं नाही, लढायचं’ अशी साद घालून शेतकऱ्यांना संपात सहभागी होण्याची साद घालण्यात आली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Chaitrali chavan About 2 Days ago
Good though forever
0
0
Nitin kade About 94 Days ago
मी शेतकरी आहे पाऊस येतो की नाही आस वाटुलागल आहे आम्ही कोणाकडे तक्रार करायची कोर्टात की सरकार कडे बोलायला खूप आहे यव्हडच बोलतो आणि थांबतो जय शिवराय?
5
0

Select Language
Share Link
 
Search