Next
‘कॉर्निंग’चा ‘गोरिला ग्लास सिक्स’ बाजारात दाखल
प्रेस रिलीज
Wednesday, July 25, 2018 | 10:42 AM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘कॉर्निंग इन्कॉर्पोरेटेड’ने कॉर्निंग गोरिला ग्लास सिक्स’ आणला आहे. मोबाइलसाठी सर्वांत टणक काच देण्याचा दशकभराचा वारस जपत ‘गोरिला ग्लास सिक्स’ हे कॉर्निंगचे आजपर्यंतचे सर्वाधिक टिकाऊ कव्हर ग्लास बाजारात उपलब्ध करण्यात आले आहे.

याबाबत बोलताना कॉर्निंग गोरिला ग्लासचे उपाध्यक्ष आणि महा-व्यवस्थापक जॉन बेन म्हणाले, ‘ग्राहक आपल्या स्मार्टफोन्सवर जास्तीत-जास्त अवलंबून असल्याने फोन खाली पडून त्याचे नुकसान होण्याची शक्यता वाढू लागली आहे. आता कव्हर ग्लासमधून उत्तम संरक्षण मिळणे ही काळाची गरज ठरली आहे. ‘कॉर्निंग गोरिला ग्लास सिक्स’ ही ‘कॉर्निंग गोरिला ग्लास फाइव्ह’मध्ये केलेली सुधारणा असून, जास्त उंचीवरून हा फोन खाली पडल्यास त्याचे नुकसान होणार नाही आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्याची रचना अनेक वेळा फोन खाली पडल्यावर टिकण्यासाठी केलेली आहे.’   

अलीकडेच जागतिक पातळीवर करण्यात आलेल्या ग्राहक सर्वेक्षणातून असे दिसून आले की, सामान्यतः लोकांच्या हातून वर्षातून सात वेळा फोन खाली पडतो आणि त्यातील ५०हून अधिक वेळा एक मीटर किंवा त्यापेक्षा कमी अंतरावरून फोन पडतो. कव्हर ग्लासची कामगिरी सुधारण्यासाठी कॉर्निंगच्या वैज्ञानिकांनी फोन अनेकवेळा खाली पडण्याची समस्या दूर करण्यासाठी एक पूर्णपणे नवीन साहित्य विकसित करून तयार केले आहे. सामान्यतः प्रयोगशाळेतील तपासण्यांमध्ये ‘गोरिला ग्लास सिक्स’ अत्यंत टणक पृष्ठभागावर एक मीटरवरून १५ वेळा खाली पडल्यावर वाचला आहे. हे प्रमाण ‘गोरिला ग्लास फाइव्ह’च्या तुलनेत सुमारे दुप्पट आहे. याच तपासणी परिस्थितीअंतर्गत स्पर्धात्मक ग्लास घटक जसे सोडालाइम आणि अ‍ॅल्युमिनोसिलिकेट पहिल्याच वेळी पडल्यानंतर वाचू शकले नाहीत.

कॉर्निंग गोरिला ग्लास आणि कॉर्निंग स्पेशालिटी मटेरियल्सचे तंत्रज्ञान आणि उत्पादन विकास विभागाचे उपाध्यक्ष डॉ. जयमिन अमीन म्हणाले, ‘गोरिला ग्लास सिक्स हा पूर्णपणे नवीन ग्लास घटक आहे, जो रासायनिकदृष्टया मजबूत करून ‘गोरिला ग्लास फाइव्ह’सोबत शक्य असलेल्या जास्त कॉम्प्रेशनपेक्षा जास्त पातळी देऊ शकतो. त्यामुळे ‘गोरिला ग्लास सिक्स’ला नुकसानाला जास्त प्रतिबंध करणे शक्य होते.’

कॉर्निंग गोरिला ग्लासचे मार्केटिंग आणि इनोव्हेशन प्रॉडक्ट्सचे विभागीय उपाध्यक्ष, स्कॉट फॉरेस्टर म्हणाले, ‘फोन पडण्याची उंची आणि वारंवारतेबरोबरच ‘गोरिला ग्लास सिक्स’ची रचना काचेचा वापर करणार्‍या आधुनिक डिझाइन्सच्या गरजा पूर्ण करण्यासाठी केली गेली आहे. सौंदर्य आणि कामगिरीच्या फायद्यांसोबत, तंत्रज्ञानामधून काचेकडे जास्त प्रमाणात लक्ष दिले जाते आणि ग्राहकांच्या मोबाइल इलेक्ट्रॉनिक्सच्या आवडीचे साहित्य बनले आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link