Next
बांबू हस्तकला केंद्राचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन
प्रेस रिलीज
Thursday, October 04, 2018 | 03:07 PM
15 0 0
Share this article:

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात स्थापन करण्यात आलेल्या बांबू हस्तकला व कला केंद्राचे, तसेच विद्यापीठातील जयकर ज्ञानस्त्रोत केंद्राच्या नव्या इमारतीचे उद्घाटन पाच ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी राज्याच्या वित्त, नियोजन व वने या खात्यांचे मंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहणार आहेत.

विद्यापीठाच्या वतीने कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांसह वरिष्ठ अधिकारी, विविध खात्याचे मंत्रीही उपस्थित राहणार आहेत. उद्घाटनानंतर विद्यापीठ आवारातील ‘आयुका’च्या चंद्रशेखर सभागृहात औपचारिक कार्यक्रम होणार आहे.

‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बांबू हस्तकला व कला केंद्राची स्थापना करण्यात आली असून, येथे बांबू हस्तकलेचे प्रशिक्षण आणि संशोधनाचे काम चालणार आहे. त्यासाठी विद्यापीठाला ३५ लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाबरोबरच राहुरी येथील कृषी विद्यापीठ आणि अमरावतीमधील संत गाडगेबाबा विद्यापीठामध्येही अशी केंद्रे स्थापना करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. या केंद्राच्या उद्घाटनाबरोबरच जयकर ग्रंथालयाच्या नव्या इमारतीचे उद्घाटनही राज्यपालांच्या हस्ते होणार आहे,’ अशी माहिती विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी दिली.

उद्घाटनाविषयी :
दिवस : शुक्रवार, पाच ऑक्टोबर २०१८
वेळ : सकाळी ११ वाजता
स्थळ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, ललित कला केंद्र, गणेशखिंड रोड, औंध, पुणे
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 165 Days ago
How about it's marketing ?
0
0

Select Language
Share Link
 
Search