Next
मॅक्झिम गॉर्की
BOI
Wednesday, March 28, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this story

साहित्याच्या नोबेल पुरस्कारासाठी पाच वेळा नामांकन मिळूनही पुरस्काराने हुलकावणी दिलेला आणि टॉल्स्टॉय व चेकॉव्हखालोखाल लोकप्रियता लाभलेल्या अलेक्साय मॅक्झिमोविच पेश्कॉव्हचा २८ मार्च हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्याचा अल्प परिचय....
...... 
२८ मार्च १८६८ रोजी निझ्नीमध्ये जन्मलेला अलेक्साय मॅक्झीमोविच पेश्कॉव्ह ऊर्फ ‘मॅक्झिम गॉर्की’ हा सुप्रसिद्ध रशियन कथाकार आणि कादंबरीकार! त्याचं लहानपण विपन्नावस्थेत गेलं होतं. त्या संघर्षमय काळात त्याने जे जीवन बघितलं, त्यावर आधारलेल्या त्याच्या भटक्या आणि विमुक्तांच्या कथा गाजल्या. त्या कटू अनुभवांमुळेच त्याने लेखन करताना आपल्या नावापुढे ‘गॉर्की (कटुता)’ हे टोपण आडनाव घेतलं होतं!
 
वयाच्या २७व्या वर्षी त्याची ‘चेल्काश’ ही कथा आणि त्यापाठोपाठ चार वर्षांनी आलेली ‘ट्वेंटी सिक्स मेन अँड ए गर्ल’ या कथा प्रचंड गाजल्या आणि त्याला टॉल्स्टॉय आणि चेकॉव्हखालोखाल लोकप्रियता लाभली. पुढे त्याच्या ‘थ्री ऑफ देम’, ‘दी लाइफ ऑफ मेत्वेय कोझेम्याकीन’, ‘ओकुरोव्ह सिटी’ आणि ‘मदर’ यांसारख्या कादंबऱ्या आल्या; मात्र त्याला जगभर प्रसिद्धी लाभली ती त्याच्या ‘दी लोवर डेप्थ्स (ऊर्फ ‘ए नाइट्स लॉजिंग)’ या नाटकामुळे! 

माय चाइल्डहूड, दी ओल्ड वूमन इझेर्गील, मेकर त्शुद्र, अनटाइमली थॉट्स, डॅन्कोज बर्निंग हार्ट, दी स्पाय असं त्याचं इतरही लेखन प्रसिद्ध आहे. त्याला नोबेल पुरस्कारासाठी पाच वेळा नामांकन मिळालं होतं. १८ जून १९३६ रोजी त्याचा मृत्यू झाला.   

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link