Next
पुणे ते सिंगापूर थेट विमानसेवा एक डिसेंबरपासून
जेट एअरवेजतर्फे तिकीटदरात भरघोस सवलत
प्रेस रिलीज
Thursday, October 25, 2018 | 05:02 PM
15 0 0
Share this story

पुणे :  ‘जेट एअरवेज’ची पुणे ते सिंगापूर थेट विमानसेवा एक डिसेंबरपासून सुरू होत आहे. दररोज ही विमानसेवा उपलब्ध होणार आहे. जेट एअरवेजने स्वागतमूल्य म्हणून तिकीट दरात खास सूट दिली आहे. परतीच्या प्रवासासह पुणे ते सिंगापूर हे तिकीट इकॉनॉमी श्रेणीसाठी २३ हजार ९९९ रुपये आणि प्रीमिअर श्रेणीसाठी ६६ हजार ९९९ इतके ठेवण्यात आले आहे. या सवलतींचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना २४ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत बुकींग करावे लागेल. या नव्या सेवेमुळे पुण्याहून सिंगापूरला थेट विमानसेवा देणारी जेट एअरवेज ही पहिली एअरलाईन कंपनी ठरणार आहे. 

पुण्याहून सिंगापूरला पर्यटनासाठी आणि उद्योग-व्यवसायासाठी जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. आतापर्यंत थेट विमानसेवा नसणाऱ्या पुण्यासारख्या शहरातून सिंगापूरमध्ये सर्वाधिक संख्येने प्रवाशांचे आगमन झाले, याची नोंद झाल्यावर आणि प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन ही नवीन सेवा सुरू करण्यात आली आहे. पुणे ते सिंगापूर ही फ्लाईट क्र,. ९ डब्ल्यू २२, ही पुण्याहून भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ५.१० मि. वाजता निघेल. सिंगापूरमध्ये ती तेथील स्थानिक वेळेनुसार दुपारी एक वाजून १५ मिनिटांनी पोहोचेल. परतीच्या प्रवासात विमान सिंगापूरहून स्थानिक वेळेनुसार रात्री नऊ वाजता निघेल व पुण्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री १२ वाजून ५ मिनिटांनी पोहोचेल.

तिकीट दरातील या सवलती प्रवाशांना त्यांच्या पुढील प्रवासासाठीही मिळवता येतील. सिंगापूरमार्गे ब्रिस्बेन, जकार्ता, देनपसार-बाली, फुकेत, क्वालालंपूर, मेलबर्न, नादी, पर्थ, सुरबाया, सिडनी,  दारविन येथे जाणाऱ्यांनाही या संधीचा लाभ घेता येईल.


जेट एअरवेजचे जागतिक विक्री व वितरण विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष राज शिवकुमार म्हणाले, ‘पुणे आणि सिंगापूर या दरम्यान थेट कनेक्टिव्हिटी देणारी जेट एअरवेज ही पहिली भारतीय एअरलाईन ठरणार आहे. २०१७ मध्ये सिंगापूरला ३६ हजाराहून अधिक प्रवासी पुण्याहून आले होते. थेट फ्लाईट नसतानादेखील इतक्या मोठ्या संख्येने प्रवासी आलेले पुणे हे भारतातील एकमेव शहर ठरले होते. आता विनाथांबा, दररोज विमानसेवा या दोन शहरांमध्ये सुरू केल्याने मौजमजेसाठी पर्यटनाला जाणाऱ्या प्रवाशांना लाभ होणार आहे, कारण सिंगापूर हे पुण्याच्या पर्यटकांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय ठिकाण आहे. त्याचप्रमाणे आयटी, बॅंकिंग आणि आर्थिक क्षेत्रातील व्यावसायिकांना सिंगापूरला येण्यासाठी ही थेट, कमी वेळ लागणारी फ्लाईट मिळाल्याने तेही खूष होतील.’

‘भारत व आसियान देशांमध्ये हवाई प्रवासाचे प्रमाण वाढले असून, व्यावसायिक प्रवाशांची सिंगापूर व भारत यांच्यातील ये-जा २०१७ या वर्षात १७ टक्क्यांनी वाढली होती. सिंगापूर हा भारतात सर्वाधिक गुंतवणूक करणारा जगातील आठवा आणि आसियान देशांमधील सर्वात मोठा देश आहे. सिंगापूरमध्ये भारतीय नागरिकांची लोकसंख्या वाढत असून दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध दृढ असल्याने त्यांच्यात हवाई वाहतूकही मोठ्या प्रमाणावर हवी, अशी प्रवाशांची मागणी होती. त्याचबरोबर, सिंगापूरमध्ये पर्यटन व मनोरंजनासाठी जाणाऱ्यांची संख्याही वेगाने वाढत आहे. २०१६ मध्ये सुमारे भारतातून एक लाख क्रूझ पॅसेंजर सिंगापूरला गेले होते. ही कोणत्याही एखाद्या देशाची सर्वात मोठी पर्यटक संख्या असल्याचे सिंगापूर पर्यटन मंडळानेही मान्य केले आहे. ऑस्ट्रेलिया हे भारतीय विद्यार्थ्यांच्या दृष्टीने उच्च शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र आहे. ऑस्ट्रेलियाला सिंगापूरमार्गे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे’, असेही शिवकुमार यांनी सांगितले.   
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link