Next
‘अॅड्रेस वन’ला ग्राहकांचा उत्कृष्ट प्रतिसाद
प्रेस रिलीज
Saturday, May 05, 2018 | 12:27 PM
15 0 0
Share this article:

प्रातिनिधिक फोटोमुंबई : पेनिन्सुला लँड लिमिटेड या अशोक पिरामल ग्रुपमधील रिअल इस्टेट विकसक कंपनीने पुण्याजवळील गहुंजे येथील नुकत्याच सादर केलेल्या ‘अॅड्रेस वन’ या प्रकल्पातील ६५० अपार्टमेंट्सची विक्री केली असून, त्यांची किंमत एकूण १५० कोटी रुपये आहे. परवडणाऱ्या घरांच्या हा प्रकल्प या कंपनीचा आतापर्यंतचा सर्वात यशदायी प्रकल्प ठरला आहे.
 
पेनिन्सुला लँड कंपनीने मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील गहुंजे येथे ५० एकर जागेत ‘अॅड्रेस वन’ हा आलिशान अपार्टमेंट्सचा प्रकल्प उभारला आहे. एमसीए क्रिकेट स्टेडियमशेजारीच असणाऱ्या या प्रकल्पात वन बीएचके ते थ्री बीएचके या टप्प्यांतील पाच प्रकारचे फ्लॅट उपलब्ध आहेत. सर्व कर, स्टॅम्प ड्यूटी आदी शुल्क धरून १८ लाख रुपयांपासून सुरू होणाऱ्या येथील किंमती व कंपनीचा ब्रॅंड यांमुळे या प्रकल्पाला भरघोस प्रतिसाद मिळाला.

‘सर्वांसाठी लक्झरी’ हे ब्रीदवाक्य असलेल्या या प्रकल्पात आलिशान घरे, त्याचबरोबर परवडणारी घरेही आहेत. चार फेजेसमध्ये उभारल्या गेलेल्या ‘अॅड्रेस वन’मध्ये चारमजली ५१ इमारती आहेत. त्यात एकेका मजल्यावर चारच फ्लॅट बांधण्यात आलेले आहेत. प्रकल्पात एकूण ९०० फ्लॅट आहेत. ‘पेनिन्सुला’चा हा पुण्यातील पहिलाच परवडणाऱ्या आलिशान घरांचा प्रकल्प आहे. यापूर्वी या कंपनीने हिंजवडी येथे ‘अशोक मेडोज’ या नावाचा आलिशान घरांचा प्रकल्प उभारलेला होता. ‘अॅड्रेस वन’चे डिझाइन प्रख्यात आर्किटेक्ट हफीज कॉन्ट्रॅक्टर यांनी केलेले आहे. अॅनारॉक प्रॉपर्टी कन्सल्टंट्स यांच्याशी ‘पेनिन्सुला’ने भागीदारी केली आहे.

‘पेनिन्सुला’चे मार्केटिंग विभागाचे संचालक नंदन पिरामल यांनी सांगितले, ‘गहुंजेतील ‘अॅड्रेस वन’ला मिळालेल्या अपूर्व प्रतिसादामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. या प्रकल्पाची उभारणी नुकतीच झाली होती आणि लगेचच यातील ९०० पैकी ७० टक्के फ्लॅट विकले गेले. ‘सर्वांसाठी घरे’ या तत्वावर आमचा विश्वास आहे व ‘अॅड्रेस वन’मधून यासंदर्भातील पहिले पाऊल आम्ही टाकले आहे.’

‘पुणे हे शहर मुंबईपासून अगदी जवळ असल्याने, तसेच पुण्यात उद्योग व आयटी क्षेत्रातील अनेक नामवंत कंपन्या असल्याने या शहराकडे विकसक नेहमीच मोठी बाजारपेठ म्हणून पाहतात. पुण्यात त्यांना मोठा वाव आहे, तसेच गहुंजेसारखी ठिकाणे ही निवासी बांधकामांसाठी अगदी आदर्श ठरत आहेत. रिअल इस्टेट या क्षेत्रात किंमतींना फार महत्त्व असल्याने परवडणाऱ्या घरांना प्रचंड मागणी असणार आहे,’ असे ते म्हणाले.

गहुंजे हे ठिकाण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आहे. त्यामुळे ते पुणे, मुंबई व नव्या मुंबईलाही सोयीस्कर आहे. साहजिकच या परिसरात औद्योगिक विकास होत आहे. आकुर्डी हे गहुंजेपासून सर्वात जवळचे रेल्वे स्थानक आहे. त्याचप्रमाणे एमसीए क्रिकेट स्टेडियम, सिम्बायोसिस विद्यापीठ, डी. वाय. पाटील महाविद्यालय, आदित्य बिर्ला रुग्णालय आदी सुविधांनी गहुंजेचे महत्त्व वाढवले आहे. गहुंजेपासून ‘एमआयडीसी’मार्गे इतर ठिकाणीही सहज जाता येते. हिंजवडी आयटी पार्क, तळवडे आयटी पार्क ही प्रख्यात ठिकाणे गहुंजेपासून जवळ आहेत.

‘पेनिन्सुला लॅंड’विषयी :
अशोक पिरामल ग्रुपमधील पेनिन्सुला लॅंड लिमिटेड ही कंपनी जागतिक दर्जाची लॅंडमार्क बांधकामे करण्याविषयी प्रख्यात आहे. शेअर बाजारात नोंदणी करून घेणारी रिअल इस्टेट क्षेत्रातील ही पहिली कंपनी आहे. यावरूनच या कंपनीमध्ये कॉर्पोरेट गव्हर्नन्सला आणि पारदर्शी व प्रामाणिक व्यवहारांना किती मोठे महत्त्व दिले जाते, हे दिसून येते.

पेनिन्सुला लॅंड ही अनेक व्यवसाय एकत्र आणणारी, बहुआयामी स्वरूपाची कंपनी आहे. रिटेल क्षेत्रासाठीची बांधकामे, जागतिक दर्जाचे व्यावसायिक प्रकल्प उभारणी, मोठे निवासी प्रकल्प आदी कामे ही कंपनी करते. आतापर्यंत या कंपनीने ७० लाख चौरस फूट इतक्या क्षेत्रफळाची बांधकामे करून दिलेली आहेत; तसेच एक कोटी चौ. फूट क्षेत्रफळाची बांधकामे सध्या प्रगतीपथावर आहेत. मुंबई, बंगळूर, पुणे, गोवा, नाशिक व लोणावळा येथे ही बांधकामे सुरू आहेत. मुंबईमध्ये पेनिन्सुला कॉर्पोरेट पार्क, पेनिन्सुला टेक्नोपार्क, पेनिन्सुला बिझनेस पार्क, क्रॉसरोड्स, सीआर-टू, अशोक टॉवर्स व अशोक गार्डन्स आदी नामवंत प्रकल्प या कंपनीने उभारले आहेत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search