Next
‘डीसीबी’तर्फे चौथ्या तिमाहीवर चर्चा
प्रेस रिलीज
Thursday, April 19 | 12:17 PM
15 0 0
Share this story

मुंबई : डीसीबी बँक लिमिटेडच्या संचालक मंडळाने बेंगळुरू येथे १४ एप्रिल २०१८ रोजी झालेल्या बैठकीत चौथ्या तिमाहीतील (आर्थिक वर्ष २०१८ मधील चौथी तिमाही) व ३१ मार्च २०१८ पर्यंतच्या वर्षातील (आर्थिक वर्ष २०१८) ऑडिटेड आर्थिक निकालांवर चर्चा केली.

या चर्चेतून आर्थिक वर्ष २०१८ मधील समोर आलेली ठळक वैशिष्ट्ये अशी : ३१ मार्च २०१८ पर्यंत बँकेच्या शाखांचे जाळे ३१८ शाखा इतके होते. या आर्थिक वर्षात बँकेचा करोत्तर नफा २४५ कोटी रुपये होता. २०१७चा विचार करता त्यात २३ टक्क्यांनी वाढ झाली. २०१८ मध्ये बँकेचा करपूर्व नफा ३८६ कोटी रुपये होता. २०१७ मधील ३०७ कोटी रुपयांच्या तुलनेत त्यात २६ टक्क्यांनी वाढ झाली.

ऑपरेटिंग नफा ५२५ कोटी रुपये होता. अगोदरच्या वर्षातील ४१८ कोटी रुपयांच्या तुलनेत त्यात २६ टक्क्यांनी वाढ झाली. बँकेने ९९५ कोटी रुपये नेट इंटरेस्ट इन्कम मिळवले. गेल्या वर्षी याच कालावधीतील ७९७ कोटींच्या तुलनेत त्यात २५ टक्क्यांनी वाढ झाली. नॉन-इंटरेस्ट इन्कम ३१० कोटी रुपये मिळाले. गेल्या वर्षी तुलनेत त्यात २५ टक्क्यांनी वाढ झाली. गेल्या वर्षी याच कालावधीच्या तुलनेत कोअर फी इन्कममध्ये (कमिशन, एक्स्चेंज व ब्रोकरेज) ३३ टक्क्यांनी वाढ झाली.

३१ मार्च २०१८पर्यंत, नेट अॅडव्हान्सेसमध्ये २० हजार ३३७ कोटींपर्यंत वाढ झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात २९ टक्के वाढ झाली. या वर्षात बँकेच्या ठेवी २४ हजार सात कोटींपर्यंत वाढल्या. बँकेच्या रिटेल कासा व रिटेल टर्म डिपॉझिटमुळे बँकेला मिळणारा स्थिर स्रोत कायम राहिला. एकूण ठेवींच्या तुलनेत रिटेल ठेवी (अॅग्री व समावेशक बँकिंगसह) ७४ टक्के होत्या. ३१ मार्च २०१८ पर्यंत, कासा रेश्यो २४.३३ टक्के होता. ३१ मार्च २०१७पर्यंत तो २४.३१ टक्के होता. बचत खात्यांमध्ये दर वर्षी २७ टक्के दराने वाढ झाली. आर्थिक वर्ष २०१८मध्ये नेट इंटरेस्ट इन्कम (एनआयएम) ४.१६ टक्के झाले. २०१७मध्ये ते ४.०४ टक्के एवढे होते.

३१ मार्च २०१८पर्यंत ग्रॉस एनपीए रेश्यो १.७९ टक्के होता, तर ३१ मार्च २०१७पर्यंत १.५९ टक्के नेट रिस्ट्रक्चर्ड स्टँडर्ड अॅडव्हान्सेसचे प्रमाण ३४ कोटी रुपये होते व त्यामध्ये केवळ पाच खात्यांचा समावेश होता. ३१ मार्च २०१८पर्यंत, नेट एनपीए रेश्यो ०.७२ टक्के झाला. २०१७पर्यंत तो ०.७९ टक्के होता. ३१ मार्च २०१८पर्यंत प्रोव्हिजन कव्हरेज ७५.७२ टक्के होते. ३१ मार्च २०१८पर्यंत भांडवल पर्याप्तता गुणोत्तर (सीएआर) १६.४७ टक्के होते, तर बेसल ३ नियमांनुसार टिअर I चे प्रमाण १२.७२ टक्के व टिअर II चे प्रमाण ३.७५ टक्के होते.

आर्थिक वर्ष २०१८मधील चौथ्या तिमाहीतील ठळक वैशिष्ट्ये : आर्थिक वर्ष २०१८मधील चौथ्या तिमाहीत बँकेचा करोत्तर नफा ६४ कोटी रुपये झाला. २०१७मधील चौथ्या तिमाहीत तो ५३ कोटी इतका होता. २०१८मधील चौथ्या तिमाहीत करपूर्व नफा १०३ कोटी रुपये आहे. गेल्या वर्षी चौथ्या तिमाहीच्या तुलनेत त्यात २६ टक्क्यांनी वाढ झाली.

ऑपरेटिंग नफा १४२ कोटी रुपये आहे. आधीच्या तुलनेत त्यात २३ टक्क्यांनी वाढ झाली. बँकेने २६४ कोटी रुपये नेट इंटरेस्ट इन्कम मिळवले. गेल्यावर्षी याच कालावधीच्या तुलनेत ते २० टक्क्यांनी वाढले. बँकेने ८५ कोटी रुपये नॉन इंटरेस्ट इन्कम मिळवले. गेल्यावर्षी याच कालावधीतील तुलनेत ते ३४ टक्के वाढले.

२०१८मधील कामगिरीविषयी व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी मुरली एम. नटराजन यांनी सांगितले, ‘शाखा विस्तार करण्याच्या धोरणाचे अपेक्षित परिणाम दिसून येत असून, आतापर्यंत आम्ही समाधानकारक प्रगती केली आहे. अनुत्पादक मालमत्तांचे प्रमाण कमीत कमी राखून, स्थिर, सातत्यपूर्ण व नफात्मक प्रगती करणे, हे आमचे उद्दिष्ट आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link