Next
‘एमसीई’ सोसायटीच्या शाळांचे दहावी परीक्षेत यश
प्रेस रिलीज
Monday, June 10, 2019 | 01:24 PM
15 0 0
Share this article:

एमसीई सोसायटीपुणे : महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन (एमसीई) सोसायटीच्या शाळांनी दहावीच्या परीक्षेत चांगले यश मिळवले आहे. अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूलचा शंभर टक्के निकाल लागला आहे. एमसीईएस इंग्लिश मीडियम स्कूलचा निकाल ७८ टक्के लागला. अँग्लो उर्दू बॉइज हायस्कूलचा इंग्रजी माध्यमाचा निकाल ९५ टक्के निकाल लागला. सेमी इंग्लिश माध्यमाचा निकाल १०० टक्के लागला. उर्दू माध्यमाचा निकाल ९० टक्के लागला. 

अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूलमधून रुकैय्या शमीम शेख ९३ टक्के मिळवून शाळेत प्रथम आली. एमसीईएस इंग्लिश मीडियम स्कूलची फईका इम्तियाझ अन्सारी ८५ टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम आली. अँग्लो उर्दू बॉइज हायस्कूलचा मोहम्मद झकी सांगे ८९ टक्के गुण मिळवून प्रथम आला. सेमी इंग्लिश माध्यमातून महंमद अब्दुल चौधरी ७८ टक्के गुण मिळवून, तर उर्दू माध्यमातून अयाज शेख ८४ टक्के गुण मिळवून प्रथम आला. 

‘एमसीई’ सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार, अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापक आएशा शेख, अँग्लो उर्दू बॉइज हायस्कूलचे मुख्याध्यापक परवीन शेख, एमसीईएस इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापक रुमाना शेख, रबाब खान यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search