Next
‘वनप्लस’च्या ब्रँड अॅम्बेसेडरपदी अमिताभ बच्चन!
BOI
Tuesday, March 07, 2017 | 02:36 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : अभिनेते अमिताभ बच्चन यांची ‘वनप्लस’ या मोबाइल कंपनीच्या ब्रँड  अॅम्बेसेडरपदी निवड करण्यात आली आहे. ‘वनप्लस’ ही मूळची चायनाची कंपनी असून सध्या मोबाइल जगतामध्ये या कंपनीच्या हॅण्डसेट्सना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. त्यातही आता बिग बींच्या लोकप्रियतेचा फायदाही ‘वन प्लस’ला फायदेशीर ठरणार यात शंका नाही.

‘महानायकासोबत जोडलं जाणं हे एखाद्या गोष्टीला कमी न ठरवण्याचा पुनरूच्चार करणे आणि कंपनीची परिपूर्ण होण्याच्या दृष्टीने वाटचाल करण्यासारखे आहे’, असं वनप्लसच्या पत्रकात म्हटलं आहे. ‘वनप्लस  ब्रँडची वाढती लोकप्रियता पाहता आता हा व्यवसाय वरच्या पातळीवर नेण्यासाठी आम्ही आता एका नव्या मार्गाने ग्राहकांसोबत एक अर्थपूर्ण नाते बनवू पाहात आहोत’, असे वक्तव्य ‘वन प्लस’चे मुख्य कार्यकारी अध्यक्ष पेते लौ यांनी केले. अमिताभ बच्चन यांना  ब्रँडचा नवा चेहरा बनवत आम्ही ग्राहकांसोबत असलेले नाते आणखी दृढ करण्यासाठी त्याचा वापर करणार आहोत असेही पेते म्हणाले.

दरम्यान बिग बींनी आजवर बऱ्याच  ब्रँडसचे  ब्रँडअॅम्बेसेडरपद भूषविले आहे. त्यातच नव्याने आलेल्या ‘वनप्लस’ विषयी बोलताना अमिताभ बच्चन म्हणाले, ‘मी स्वत: वनप्लस वापरतो. त्यामुळे मी हा ब्रँड माझ्या देशात प्रमोट करण्यासाठी फारच उत्सुक आहे. एका मोठ्या  ब्रँडचा मी एक भाग झाल्यामुळे मला फारच आनंद होत आहे’.
कलाकार, खेळाडू आणि त्यांच्या लोकप्रियतेचा वापर करत गेल्या बऱ्याच वर्षांपासून विविध कंपन्या त्यांच्या  ब्रँड अॅम्बेसेडरपदी अशाच काही मंडळींची निवड करत आहे. जेणेकरुन त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा अमुक एका कंपनीला होऊ शकेल. बरेच सेलिब्रिटी आणि कलाकार मंडळी सध्या या क्षेत्रातही सक्रिय झाले आहेत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search