Next
मधुमेह विरुद्ध आपण
BOI
Wednesday, October 31 | 09:39 AM
15 0 0
Share this story

भारतात मधुमेहाचे प्रमाण वाढत आहे, असे सतत ऐकायला-वाचायला मिळते; पण तरीही आपण जीवनशैलीत बदल करती नाही, हे वास्तव आहे. यावर बोट ठेवत डॉ. अश्विन सावंत यांनी ‘मधुमेह विरुद्ध आपण!’मधून मधुमेहाविषयी सर्वांग माहिती दिली आहे. मधुमेहाचा धोका कोणाला, त्याची कारणे, मधुमेहाचे प्रकार, लक्षणे, मधुमेह झाल्यावर शरीरात काय घडते, मधुमेहींनी काय खावे, काय टाळावे, इन्सुलिन म्हणजे काय, हे समजावून दिले आहे.

दुध व दुधाच्या पदार्थांच्या अतिसेवनाचे परिणाम, व्यापारी डावपेच, मैद्याचे अर्थकारण याचे गणित सोडवून दाखविले आहे. कोल्ड्रिंक्स, साखर, चहा, गोडाचा अतिरेक व त्याचे विविध वयातील परिणाम स्पष्ट केले आहे. प्रौढ वयातील मधुमेह, पीसीओएस म्हणजे काय, लक्षणे, कारणे, अति इन्सुलिनचे परिणाम, मेटाबोलिक सिंड्रोम, मधुमेहाची पूर्वरूपे, गर्भारपणातील मधुमेह, मधुमेहासाठी आवश्यक प्रयोगशालेय तपासण्या, रक्तातील साखर कधी तपासावी, ती नियंत्रणात आहे का? मधुमेही ‘हायपो’ का होतात, मधुमेहजन्य दीर्घकालीन घातक विकृती, हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका, मूत्रपिंडविकृती, मधुमेह आणि लैंगिक अकार्यक्षमता अशी सर्व माहिती सविस्तरपणे दिली आहे.      
 
प्रकाशन : नवता बुक वर्ल्ड
पृष्ठे : २२०
मूल्य : १८० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link