Next
‘महिंद्रा’तर्फे ‘महिंद्रा क्रेडिट रिस्क योजना’ सादर
प्रेस रिलीज
Friday, July 27, 2018 | 10:43 AM
15 0 0
Share this story

पुणे : महिंद्रा म्युच्युअल फंड या महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या (एमएमएफएसआय) उपकंपनीने मध्यम ते दीर्घ काळात समाधानकारक उत्पन्न आणि भांडवलवृद्धीचे उद्दिष्ट असणाऱ्या गुंतवणुकदारांसाठी ‘महिंद्रा क्रेडिट रिस्क योजना’ ही ओपन एंडेड डेट योजना आणली आहे.

ही योजना प्रामुख्याने एए आणि त्याखालील रेटिंग असलेल्या कॉर्पोरेट बाँड्समध्ये (एए प्लस रेटिंग असलेले कॉर्पोरेट बाँड्स सोडून) गुंतवणूक करणार आहे. नव्या फंडाची ऑफर २७ जुलै २०१८ रोजी सुरू होणार असून, १० ऑगस्ट २०१८ रोजी बंद होणार आहे. ही योजना सातत्यपूर्ण विक्री आणि पुनर्खरेदीसाठी वितरण तारीख २०१८ नंतरच्या कामाच्या पाच दिवसांत परत खुली होणार आहे.

‘महिंद्रा अँड महिंद्रा’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष बिष्णोई म्हणाले, ‘महिंद्रा क्रेडिट रिस्क योजना मूलभूत पातळीवर मजबूत असणाऱ्या, उच्च लिक्विडीटी असलेल्या आणि प्रसिद्ध कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत वैविध्यपूर्ण डेट पोर्टफोलिओच्या आधारे भारताच्या विकासाच्या प्रवास सहभागी होण्याची संधी गुंतवणूकदारांना देणार आहे. आमच्या मते ही ऑफर दीर्घकालीन गुंतवणुकीची संधी देणार असून, म्हणूनच ज्या गुंतवणुकदारांना समाधानकारक उत्पन्न आणि भांडवलवृद्धी हवी आहे त्यांनी या योजनेत आवर्जून सहभागी झाले पाहिजे.’

महिंद्रा क्रेडिट रिस्क योजना मध्यम ते उच्च सुरक्षा गुंतवणूक पातळीच्या दर्जेदार माध्यमांमध्ये गुंतवणूक करणार आहे आणि सर्वात कमी जोखीम व कमी अस्थिरतेसह जास्तीत जास्त परतावे मिळवणार आहे. सिक्युरीटीजची निवड जोखीम कवच प्रक्रियेवर आधारित – अंतर्गत संशोधन आणि प्रक्रिया फ्रेमवर्क मध्यम प्रकारची जोखीम घेऊ शकणाऱ्या आणि पोर्टफोलिओमध्ये वैविध्य आणू पाहाणाऱ्या व जोखीम स्वीकारत चांगले परतावे देण्याची क्षमता असलेल्या गुंतवणुकीच्या पारंपरिक पर्यायांना पर्याय हवा असणाऱ्यांना महिंद्रा क्रेडिट रिस्क योजना योग्य आहे. ही योजना सुरक्षा, लिक्विडीटी आणि उत्पन्न यांचे चांगले समीकरण असलेल्या गुंतवणुकदारांसाठी योग्य आहे.

ही योजना प्रामुख्याने किमान ६५ टक्के भाग एए आणि त्याखालील रेटिंग असलेल्या कॉर्पोरेट बाँड्समध्ये (एए प्लस रेटिंग असलेले कॉर्पोरेट बाँड्स सोडून), डेट आणि मनी मार्केट माध्यमांमध्ये (योजनेच्या निव्वळ मालमत्तेच्या ३० टक्क्यांपर्यंतच्या सुरक्षित डेटचा समावेश) ३५ टक्क्यांपर्यंत गुंतवणूक करणार आहे आणि १० टक्क्यांपर्यंत आरईआयटीएस आणि आयएनव्हीआयटीएज यांच्यातर्फे वितरित करण्यात आलेल्या व्याजदरात घट झाल्यास भांडवल वृद्धीची क्षमता असलेल्या युनिट्समध्ये १० टक्क्यांपर्यंत आणि वैविध्यपूर्ण क्षेत्रांत नोंदणीकृत डेट कंपन्यांमध्ये (किंवा नोंदणीकृत मुख्य कंपन्यांमध्ये) लक्षणीय प्रमाणात गुंतवणूक करण्याच्या हेतूने गुंतवणूक करणार आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link