Next
गझल गायकांसाठी टॅलेंट हंटचे आयोजन
प्रेस रिलीज
Thursday, June 13, 2019 | 05:05 PM
15 0 0
Share this article:

पंकज उधासनवी दिल्ली : ‘हंगामा आर्टिस्ट अलाउड’ आणि ‘खजाना’ यांनी संयुक्त विद्यमाने भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडशी भागीदारी करत ‘खजाना आर्टिस्ट अलाउड हंट’च्या दुसऱ्या आवृत्तीला सुरूवात केली आहे. भारतीय गझल गायकांसाठी हा पहिला आणि एकमेव टॅलेंट हंट असून, यात भारतीय स्पर्धकांसह आंतरराष्ट्रीय स्पर्धकांकडूनही प्रवेशिका मागविण्यात येणार आहेत. 

पंकज उधास, अनुप जलोटा, तलत अझीझ, रेखा भारद्वाज आणि सुदीप बॅनर्जी परीक्षक असलेल्या या स्पर्धेच्या दोन विजेत्यांना २६ आणि २७ जुलै २०१९ रोजी मुंबईत होणाऱ्या ‘खजाना- फेस्टिव्हल ऑफ गझल्स’मध्ये ख्यातनाम गझल गायकांसोबत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. 

गेल्या वर्षी या टॅलेंट हंट शोला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, भारतातील ७५ शहरांमधून प्रवेशिका आल्या होत्या. सहभागी होण्यासाठी इच्छुक गायक आपले गझल गातानाचे व्हिडिओ १७ जून २०१९ पर्यंत पाठवायचे आहेत. त्यातून २० स्पर्धकांची निवड केली जाईल आणि त्यांना परीक्षकांसमोर प्रत्यक्ष गझल सादर करण्यासाठी मुंबईत आमंत्रित केले जाईल. 

या बाबत बोलताना हंगामा डिजिटल मीडियाच्या आर्टिस्ट अलाउडच्या उपाध्यक्ष सौमिनी श्रीधर पॉल म्हणाल्या, ‘आपल्या स्थापनेपासूनच ‘खजाना’ने स्वतःला गझलचे सौंदर्य आणि वारसा जपणाऱ्या एका वार्षिक महोत्सवाच्या स्वरूपात लोकांसमोर आणले आहे. स्वतंत्र साहित्यासाठी प्रयत्नशील असलेले एक व्यासपीठ म्हणून आम्हाला ‘खजाना’सोबत भागीदारी करताना खूप अभिमान वाटतो आहे आणि देशातील तरुण व महत्त्वाकांक्षी टॅलेंट शोधण्याची संधी आम्हाला मिळाली आहे. मागील वर्षी, आम्हाला भारतातील ७५ शहरांमधून भरपूर प्रतिसाद मिळाला. ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय गायकांसाठी खुली झाली असून, याही वर्षी प्रचंड मोठा सहभाग मिळेल याची आम्हाला खात्री आहे.’

परीक्षक पंकज उधास म्हणाले, ‘खजाना हा माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. हा फक्त एक गझलचा कार्यक्रम नाही, तर मागील अनेक युगांपासून सुरू असलेल्या आणि भविष्यातही कायम राहणाऱ्या आगळ्यावेगळ्या कलाप्रकाराला दिलेली मानवंदना आहे. ‘खजाना आर्टिस्ट अलाउड टॅलेंट हंट’सोबत आम्ही गझल गायनातील टॅलेंट ओळखून जगासमोर आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. आमच्या दुसऱ्या वर्षात आम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचून जगभरातील गायकांसाठी व्यासपीठ निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहोत.’

‘खजाना- फेस्टिव्हल ऑफ गझल्स’ची स्थापना ख्यातनाम गझल गायक, पॅरेंट्स असोसिएशन थॅलेसेमिक युनिट ट्रस्टचे अध्यक्ष पंकज उधास आणि , कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशनचे (सीपीएए) संस्थापक संचालक, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वाय. के. सप्रू, यांनी गझल गायक तलत अझीझ आणि अनुप जलोटा यांच्या सहकार्याने केली होती. यामधून आलेली सर्व रक्कम पॅरेंट्स असोसिएशन थॅलेसेमिक युनिट ट्रस्ट (पीएटीयूटी) आणि कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशनला (सीपीएए) दिली जाईल.

व्हिडिओ पाठविण्यासाठी : www.artistaloud.com/khazana
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search