Next
बिकट वाटेची झाली वहिवाट
BOI
Tuesday, August 07, 2018 | 01:41 PM
15 1 0
Share this article:



रत्नागिरी :
रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे गावामधील स्मशानभूमीकडे जाणारी वाट अत्यंत अरुंद होती. त्यामुळे अंत्यविधीकरिता जाताना गावकऱ्यांची गैरसोय व्हायची. त्यामुळेच ही वाट रुंद करून मोठा रस्ता करणे आवश्यक होते. त्यासाठी गावातील ज्येष्ठ नागरिक सुधाकर तोडणकर यांनी स्वमालकीची जमीन दिली. त्यामुळे या अरुंद वाटेचे रूपांतर मोठ्या रस्त्यात करण्यात आले. त्यामुळे गावकऱ्यांची गैरसोय दूर झाल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले आहे. गणेशगुळ्याचे सरपंच संदीप शिंदे, उपसरपंच सुचिता जोशी, प्रज्योत गुळेकर, ग्रामपंचायत सदस्य गौरव फडके, रवी मावळणकर, जितेंद्र भार्गव तोडणकर, जितेंद्र वसंत तोडणकर, बापय तोडणकर यांनी सुधाकर तोडणकर यांचे आभार मानले आहेत.
 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search