Next
मधुमेही रुग्णांनी अनुभवला बालपणीचा आनंद
गाडगे डायबेटीस सेंटरतर्फे वार्षिक क्रीडा दिन साजरा
प्रेस रिलीज
Tuesday, February 12, 2019 | 01:16 PM
15 0 0
Share this storyमुंबई : येथील गाडगे डायबेटीस सेंटरतर्फे वार्षिक क्रीडा दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यात २००हून अधिक मधुमेही रुग्णांनी सहभागी होत सांघिक खेळांचा आनंद लुटला आणि आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला.

या स्पर्धेत रुग्णांनी मार्बल चमचा रेस, पोटॅटो रेस, बॉल फेकणे, रस्सी खेच यांसारखे खेळ खेळत बालवयातील मज्जा पुन्हा एकदा अनुभवली. या वेळी मोफत आरोग्य तपासणीही करण्यात आली.या प्रसंगी गाडगे डायबेटीस सेंटरचे मधुमेहतज्ञ डॉ. प्रदीप गाडगे म्हणाले, ‘खेळ हा तुमच्यातील दैनंदिन स्फूर्तीचे औषध आहे. तुमच्या शरीराचा खरा वेलनेस हे तुमचे शरीर, मन आणि समाधान हे आहे. खेळामुळे एखाद्याची मानसिक स्थिती चांगली आणि उत्तम होण्यास नक्कीच मदत होते; तसेच आत्मविश्वास वाढण्यास आणि स्वत:ला तल्लख करण्यासही त्याची मदत होते. शारीरिक व्यायाम, योग्य आहार, औषधोपचार व शिक्षण हे चार घटक मधुमेहाचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी अतिशय महत्त्वाचे असून, त्यासाठी दिवसातून ३० मिनिटे व्यायाम करणे आवश्यक आहे. हे नियमित केले, तर त्याचा आरोग्याला नक्कीच फायदा होईल व उत्तम जीवनशैलीसह आयुष्य आनंदी होऊ शकेल.’


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link