Next
पुणे विभागीय आयुक्तालयातर्फे पूरग्रस्तांसाठी ३२ ट्रक जीवनाश्यक वस्तू रवाना
BOI
Tuesday, August 13, 2019 | 03:03 PM
15 0 0
Share this article:

पूरग्रस्तांसाठी मदत रवाना करताना पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर ,सुबोध भावे, उपायुक्त नीलिमा धायगुडे व अन्य कर्मचारी

पुणे : पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात कार्यान्वित करण्यात आलेल्या पूरग्रस्त मदत केंद्रातून आतापर्यंत ३२ ट्रक जीवनाश्यक वस्तू कोल्हापूर व सांगली येथे पाठविण्यात आले आहेत.

डॉ. म्हैसेकर म्हणाले, ‘पूराचे पाणी ओसरत आहे. पूरग्रस्तांना आवश्यक ती मदत, वस्तू व सेवा-सुविधा गतीने पोहोचविणे आवश्यक आहे. यापुढे मदत पोहोचविण्याबरोबरच आरोग्य सेवा पुरविणे, तसेच साफ-सफाईवर भर देणे गरजेचे आहे. साथीच्या रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य विभागाने या भागातील कचरा हटवून निर्जंतुकींकरणाची कामे गतीने करावीत. पाणीपुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टीने दुरुस्ती व अन्य कार्यवाही करावी. वीज पुरवठा खंडित असणाऱ्या भागातील वीज पुरवठा तत्काळ सुरू करावा. पुराचे पाणी ओसरलेल्या मार्गावर राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस सुरू कराव्यात.’

उपायुक्त निलिमा धायगुडे यांच्या देखरेखीखाली मदत केंद्राचे कामकाज सुरू असून, विविध संस्था, संघटना व दानशूर व्यक्तींकडून मोठ्या प्रमाणात मदत होत आहे. दरम्यान, अभिनेते सुबोध भावे यांनी आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांची भेट घेऊन पूरग्रस्तांना मदत करण्याची इच्छा व्यक्त केली; तसेच सध्या पूरग्रस्तांना कोणत्या वस्तू व साहित्याची आवश्यकता आहे, याची माहिती जाणून घेतली. या वेळी अभिनेते विनोद खेडेकर, अश्विनी तेरणीकर उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search