Next
मिठाई व्यापाऱ्यांतर्फे मोदक महोत्सवाचे आयोजन
प्रेस रिलीज
Thursday, August 02, 2018 | 02:48 PM
15 0 0
Share this story

मुंबई : लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा लोकप्रिय महाराष्ट्रीय गोड पदार्थ मोदक सर्वांपर्यंत पोहचावा, तसेच राज्यातील मोदकाचे उद्योगक्षेत्र अधिक विकसित व्हावे या उद्देशाने आठ आणि नऊ सप्टेंबर रोजी द ठाणे क्लब येथे सकाळी ११ ते रात्री आठ या वेळेत जागरूकता उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात मोदक महोत्सव आयोजित केला असून, भारतातील पारंपरिक गोड पदार्थांचे अग्रेसर उत्पादक यामध्ये सहभागी होणार आहेत. महाराष्ट्रात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर पारंपरिक मिठाईतील वैविध्य एकाच छताखाली येणार आहेत.

याबाबत अधिक माहिती देताना मिठा इंडिया चळवळीचे प्रवर्तक कॅप्टन कमल चढ्ढा म्हणाले, ‘आपल्या ऐतिहासिक ठेव्याचा झपाट्याने ऱ्हास होत आहे. भारतीय पारंपरिक मिष्टानांचा प्रसार करणे आणि लोकांना आपल्या देशातील संस्कृती, परंपरा आणि भारतीय गोड पदार्थांच्या वेगळेपणाचा इतिहास माहीत व्हावा यासाठी ‘मिठा इंडिया’ या बॅनरखाली महाराष्ट्रस्थित मिठाई व्यापाऱ्यांनी या कार्यक्रमाला पाठिंबा दिला आहे. त्यांच्या पाठिंब्यासह हा उपक्रम साजरा करणे हा यामागील प्रमुख उद्देश आहे.’

मिठा इंडिया चळवळीला शुभेच्छा देताना मुंबईतील ‘कांतिलाल दामोदर मिठाईवाला’चे संस्थापक-संचालक मनोज कांतिलाल सोनी म्हणाले, ‘आपल्या राज्यातील संपन्न पदार्थांचा वारसा जपणे म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकासाठी अभिमानाची गोष्ट आहे. गणेशोत्सवासारख्या महाराष्ट्रातील जुन्या संपन्न उत्सवाला ‘मोदक महोत्सवा’ने खास मान देऊ केला आहे.’

लंडनस्थित बाजारपेठांच्या संशोधनात अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या ‘मिंटेल’ या अहवालात नमूद केले आहे, की चॉकलेटच्या बाजारपेठेतील भारत ही जगातील सर्वात जलद गतीने वाढणारी बाजारपेठ आहे. यामुळेच ‘मोदक महोत्सव’ आयोजित करून भारतीय पारंपरिक मिठाईंना अधिक चांगला ब्रँड बनवणे आणि पाश्चिमात्त्य पदार्थांसाठी पर्याय उपलब्ध करून देणे, याचबरोबर महाराष्ट्रातील मिठाई उत्पादन उद्योगक्षेत्रात कालांतराने मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण करणे अपेक्षित आहे.

मोदक महोत्सवाविषयी :
दिवस :
आठ, नऊ सप्टेंबर २०१८
वेळ : सकाळी ११ ते रात्री आठ
स्थळ : द ठाणे क्लब, मोहन कोप्पीकर रोड, तीन हात नाका, राहेजा गार्डन समोर, ठाणे (पश्चिम).
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link