Next
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला पोलिसांचा पहारा
BOI
Wednesday, July 31, 2019 | 06:13 PM
15 0 0
Share this article:


ठाणे : आज (३१ जुलै) आषाढी अमावास्या असून, हा दिवस गटारी म्हणून सर्वत्र साजरा केला जातो; या दिवशी मद्यप्राशन करण्यासाठी गर्दी नसलेल्या ठिकाणांना विशेष पसंती दर्शविली जाते. ही बाब लक्षात घेऊन संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मद्यप्राशनासाठी जाणाऱ्यांवर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ‘वॉच’ ठेवला आहे. वनात जाणाऱ्या मार्गावर चोख बंदोबस्त ठेवला असून, वनात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. येऊरमध्ये असलेल्या सर्व प्रवेशाच्या ठिकाणी सहा तुकड्यांमध्ये ४२ कर्मचाऱ्यांचा पहारा ठेवण्यात आला होता.

श्रावण महिना सुरू होण्याच्या एक दिवस आधी गटारी साजरी केली जाते. या दिवशी निसर्गाची मज्जा लुटत मद्यप्राशन करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यासाठी अनेकजण येऊरच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला प्राधान्य देतात. ही बाब लक्षात घेऊन संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सर्व प्रवेशद्वारांवर वन विभाग आणि पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 


वन विभागात जाणाऱ्या पॉइंटवर वन विभागाने ४२ कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या सहा तुकड्या बनवून बंदोबस्त ठेवला आहे. वनात जाण्यास मनाई असतानाही अनेक उत्साही तरुण-तरुणी आतमध्ये लांबवर जातात. जंगलात बिबट्या, हरण, रानमांजर, डुक्कर असे वन्यजीव   असल्याने त्यांच्या जीविताशी धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून विशेष खबरदारी घेतल्याचे वन विभाग अधिकारी राजेंद्र पवार यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search