Next
‘सायन्स-बेस्ड टार्गेट्स’ उपक्रमात महिंद्रा सॅन्यो सहभागी
प्रेस रिलीज
Tuesday, April 17, 2018 | 05:29 PM
15 0 0
Share this story

मुंबई : घातक ग्लोबल वॉर्मिंग टाळण्यासाठी हवामान विज्ञानाने सांगितलेले उपाय करण्याच्या अनुषंगाने शंभरहून अधिक जागतिक कंपन्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यात भारतातील इलेक्ट्रोलक्स, लॉरिअल व महिंद्रा सॅन्यो स्पेशल स्टील या कंपन्यांचाही समावेश आहे. सायन्स-बेस्ड टार्गेट्स मान्य करून घेणारी महिंद्रा सॅन्यो स्पेशल स्टील ही पहिली भारतीय व पहिली स्टील कंपनी ठरली आहे.

युनायटेड नेशन्स ग्लोबल कॉम्पॅक्ट, वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (डब्लूआरआय) व वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचर (डब्लूडब्लूएफ) सीडीपी, यांच्यातील सहयोग असलेल्या सायन्स बेस्ड टार्गेट्स इनिशिएटिव्हने (SBTi)  या कंपन्यांच्या उद्दिष्टांना मान्यता दिली असून, कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. जगभरातील २३ देशांतील १०३ कंपन्या यामध्ये सहभागी असून त्यातील निम्म्या कंपन्या (५७) युरोपातील आहेत. बहुतांश कंपन्यांचे मुख्यालय अमेरिका (२४ कंपन्या),  जपान (१५) व यूके (११) येथे आहे. 

महिंद्रा सॅन्यो स्पेशल स्टील कंपनीने वर्ष २०३०पर्यंत उत्पादन केल्या जाणाऱ्या प्रति टन स्टीलच्या स्कोप एक आणि दोन प्रकारच्या उत्सर्जनात ३५ टक्के  घट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. याबाबत महिंद्रा सॅन्यो स्पेशल स्टीलचे व्यवस्थापकीय संचालक उदय गुप्ता म्हणाले, ‘हवामानातील बदलांचा सामना करणे, हे आज जगापुढील सर्वात गंभीर व तातडीचे आव्हान आहे आणि एक सर्वात मोठी आर्थिक संधीही आहे. सायन्स-बेस्ड टार्गेट्स आपल्या उद्योगाचे धोरण पॅरिस करारातील धोरणांना अनुसरून ठेवते. हवामानातील घातक बदलांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावणे ही आपली जबाबदारी असतानाच,आपण अन्य भागीदारांच्या मदतीने हवामानविषयक कृती करून उद्योगाची भविष्यातील प्रगती व नफा यांची काळजी घेणे आवश्यक आहे. हा कृती आराखडा तयार करण्यासाठी सायन्स-बेस्ड टार्गेट्स मोठी मदत करतात.’
 
लॉरिअलच्या चीफ कॉर्पोरेट रिस्पॉन्सिबिलिटी ऑफिसर अलेक्झांड्रा पाल्ट म्हणाल्या, ‘लॉरिअलने ग्रीनहाउस गॅस उत्सर्जन २०३०पर्यंत २५ टक्के कमी करायचे उद्दिष्ट ठरवले आहे. गेली अनेक वर्षे आम्ही दोन्ही बाबतीत हवामानातील बदलांशी सामना करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आमच्या कंपनीमध्ये २००५ ते २०१७  या दरम्यान आम्ही आमच्या उत्पादनातील कार्बन उत्सर्जन ७३ टक्के कमी केले.’  

सायन्स बेस्ड टार्गेट्स इनिशिएटिव्हच्या भागीदारांपैकी एक असलेल्या युनायटेड नेशन्स ग्लोबल कॉम्पॅक्टच्या प्रोग्रॅम्सच्या प्रमुख लिला कार्बास्सी म्हणाल्या, ‘लो-कार्बन अर्थव्यवस्था असे परिवर्तन साधण्यासाठी आघाडी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या उद्योगांमध्ये सायन्स-बेस्ड टार्गेट्स वेगाने स्थान मिळवत असल्याचे दिसून येते. पॅरिस करारातील उद्दिष्टे राबवण्यासाठी जगभरातील वैविध्यपूर्ण क्षेत्रांतील कंपन्या उत्सुक असल्याचे त्यातून अधोरेखित होते व ते त्यांच्या उद्योगासाठीही महत्त्वाचे असल्याचे आढळते. सायन्स-बेस्ड टार्गेट्स निश्चित करण्याची तयारी दाखवणाऱ्या कंपन्या दोन अंश सेल्सिअसचे उद्दिष्ट पाळण्यासाठी बांधिलकी दर्शवत आहेत. ही अत्यंत सकारात्मक बाब आहे.’
 
 ‘आणखी २७० कंपन्यांनी सायन्स-बेस्ड टार्गेट्स ठरवण्यासाठी औपचारिक, जाहीर बांधिलकी व्यक्त केली आहे. २०१५ पासून आतापर्यंत ३७० हून अधिक कंपन्या आता सायन्स-बेस्ड टार्गेट उपक्रमामध्ये सहभागी झाल्या आहेत. २०१८ मध्ये सायन्स-बेस्ड टार्गेट निश्चित करण्याला अधिक गती येण्याची अपेक्षा आहे.’ असेही त्यांनी नमूद केले. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link