Next
दी विश्वेश्वर सहकारी बँकेचा सभासदांना दहा टक्के लाभांश
प्रेस रिलीज
Thursday, August 09, 2018 | 03:41 PM
15 0 0
Share this article:

पुणे  : दी विश्वेश्वर सहकारी बँकेने सभासदांना दहा टक्के लाभांश जाहीर केला आहे. बँकेची ४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच झाली, त्यात ही घोषणा करण्यात आली.  

या वेळी बँकेचे अध्यक्ष अनिल गाडवे म्हणाले, ‘मार्च २०१८ अखेर बँकेच्या ठेवी रुपये १,५३९ कोटी असून, कर्जे ८११ कोटी रुपयांची आहेत. एकूण व्यवसाय २,३५० कोटी झाला आहे. बँकेचा सीआरएआर १८.४९ टक्के असून, बँकेचा एकूण नफा रुपये ३५.७३ कोटी आहे.चालू आर्थिक वर्षात गत वर्षीच्या तुलनेत अधिक चांगली व्यवसाय वाढ व सर्वोत्तम वसुली करण्याचा संकल्प केला आहे.’

‘रिझर्व्ह बँकेने प्रत्येक बँकेत विद्यमान संचालक मंडळाव्यतिरिक्त जादा व्यवस्थापक मंडळ नेमण्याचे सूतोवाच केले असून,या गोष्टीला सहकार क्षेत्राने विरोध नोंदविला आहे’, असेही त्यांनी या वेळी सभासदांना सांगितले.

‘विश्वेश्वर बँक मुख्यतः गरीब व गरजू लोकांना आर्थिक मदत करीत असते. त्या दृष्टीने लवकरच बँक महिलांच्या बचत गटांना कर्ज देण्याची विशेष योजना सुरू करणार आहे. तसेच काही निवडक शाखांमध्ये कॅश स्वीकारून एटीएमसारखे पेमेंट करणारे रीसायकलर मशीन ग्राहकांच्या सेवेत दाखल करणार आहे. इंटरनेट बँकिंग सुविधा सुरू करण्याचा बँकेचा प्रयत्न राहील. ग्राहकांना लवकरच शाखांमध्ये लाईट बिल, टेलिफोन बिल इ. भरण्याची सुविधा बँक उपलब्ध करून देणार आहे’, असेही गाडवे यांनी सांगितले. 

या सभेत बँकेचे ज्येष्ठ संचालक सुनील रुकारी व बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमात वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ सभासदांचा आणि विविध क्षेत्रात यश प्राप्त केलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. उपाध्यक्ष राजेंद्र मिरजे यांनी आभार मानले.  
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search