Next
‘महिंद्रा फार्म’चा ‘पोर्टर प्राइझ २०१८’ने गौरव
प्रेस रिलीज
Thursday, June 14, 2018 | 02:43 PM
15 0 0
Share this story

मुंबई : महिंद्रा समूहाचा भाग असलेल्या फार्म इक्विपमेंट सेक्टर या महिंद्राच्या कंपनीला शेअर्ड व्हॅल्यूच्या निर्मितीसाठी अलीकडेच जीएनएफसी ‘पोर्टर प्राइझ २०१८’ या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. आधुनिक धोरण क्षेत्राचे जनक व लेजंड, तसेच अमेरिकेतील हार्वर्ड बिझनेस स्कूलमधील इन्स्टिट्यूट फॉर स्ट्रॅटेजी अँड कॉम्पिटिटिव्हनेसमधील प्राध्यापक मायकल ई. पोर्टर यांचे नाव पोर्टर प्राइझला देण्यात आले आहे. हा पुरस्कार, भारतातील कंपन्यांच्या धोरणात्मक निर्णयांचा गौरव करतो व सहभागी कंपन्यांचे मूल्यमापन निकषांच्या आधारे केले जाते.

महिंद्रा अँड महिंद्राच्या फार्म इक्विपमेंट सेक्टरचे अध्यक्ष राजेश जेजुरीकर म्हणाले, ‘आमच्या प्रयत्नांची दखल घेतल्याबद्दल व आम्हाला ‘पोर्टर प्राइझ’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार दिल्याबद्दल आम्ही इन्स्टिट्यूट फॉर कॉम्पिटिटिव्हनेसचे आभारी आहोत. महिंद्रा फार्म इक्विपमेंट सेक्टरमध्ये शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन आणेल, असे सहज उपलब्ध व परवडणारे तंत्रज्ञान आणण्याच्या दृष्टीने प्रवर्तक काम करण्यासाठी लक्ष केंद्रित करत आहोत. आमची स्मार्ट फार्म मशीनरी, प्रिसिजन फार्मिंग सोल्यूशन, डिजिटल सुविधा, कस्टम-हायरिंग व इको-सिस्टीम कनेक्ट यामार्फत आम्ही शेती अधिक उत्पादक व शेतकरी अधिक आनंदी करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. आमच्या ग्राहकांच्या चेहऱ्यावरील हास्य आम्हाला दररोज प्रेरणा देते. शेअर्ड व्हॅल्यूची निर्मिती करण्यासाठी सातत्याने आमच्याबरोबर काम केल्याबद्दल आम्ही आमचे ग्राहक, डीलर, पुरवठादार व तंत्रज्ञान भागीदार यांचे आभारी आहोत.’

पुरस्कारावर कोरले आहे की, ‘उद्योगातील तुमच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी आणि बाजारपेठ, उत्पादने यांचा पुन्हा वेध घेण्यामध्ये, व्यवसाय करण्याच्या पद्धतीमध्ये बदल करणारी, एकत्रित प्रयत्न करणारी व बदल्यात सामाजिक व आर्थिक प्रगती करणारी व त्याद्वारे आर्थिक यश मिळवणारी एक कंपनी म्हणून तुम्ही केलेल्या मोठ्या परिणामांची दखल घेण्यासाठी.’

मूल्यमापन, संवाद व परीक्षकांकडून परीक्षण याद्वारे ‘पोर्टर प्राइझ’ दिले जाते. सहभागींचे ट्रेड-ऑफ, वैविध्यपूर्ण मूल्य निर्माण करणे, फिट अशा स्पर्धेमध्ये वेगळेपण दर्शवणाऱ्या धोरणांबद्दलच्या निकषांचे सखोल विश्लेषण केले जाते.

‘महिंद्रा’ने भारतीय शेतीच्या उत्पादकतेत वाढ करण्यासाठी व शेतीमध्ये भरभराट आणण्यासाठी आपल्या व्यवसायाचे व्हिजन ट्रॅक्टर व त्या पलीकडे विस्तारले आहे. भारतात यांत्रिकीकरणाचे प्रमाण कमी असल्याने, शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादकतेत वाढ करण्यास व त्यांचा उदय होण्यास मदत करण्यासाठी ‘महिंद्रा’ महत्त्वाची भूमिका बजावते. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे व फार्मिंग ३.० युगासाठी योगदान देण्याचे ‘महिंद्रा’चे उद्दिष्ट आहे.

‘महिंद्रा’ने अलीकडेच पहिलेवहिले स्वायत्त ट्रॅक्टर तंत्रज्ञान दर्शवून तंत्रज्ञानाद्वारे काही गोष्टी शक्य करण्याबद्दलची बांधिलकी दर्शवली आहे. अतिशय यशस्वी व या क्षेत्रातील पहिला उपक्रम. भारतीय शेतीतील अनेक वर्षांच्या अनुभवांच्या आधारे, ‘महिंद्रा’ने आता भारतीय शेतकऱ्यांच्या अद्याप पूर्ण न झालेल्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने स्मार्ट सोल्यूशन निर्माण करण्यासाठी वाटचाल सुरू केली आहे; तसेच, ‘DiGiSENSE’मुळे ट्रॅक्टर श्रेणीमध्ये क्लाउड-आधारित तंत्रज्ञान सुविधा देणारी ‘महिंद्रा’ ही भारतातील पहिली ओईएम ठरली आहे. सध्या, ‘महिंद्रा’कडे १५ एचपी ते ७५ एचपी क्षमतेचे निरनिराळे ट्रॅक्टर असून त्यांनी जिवो, युवो व नोवो या तंत्रज्ञानाच्या बाबतीत आधुनिक सुविधांना पाठबळ दिले आहे.

‘महिंद्रा’ची सर्व उत्पादने जमिनीच्या मशागतीपासून कापणीपर्यंत व कापणीनंतरच्या कामांपर्यंत शेतकऱ्यांच्या विविध गरजा पूर्ण करतात. ग्राहक केंद्रितता व अतिशय दर्जेदार, परवडणारी उत्पादने बनवण्याची जबाबदारी हे ‘महिंद्रा‘च्या यशाचे गमक आहे. कंपनीने ग्रामीण भागातील विकासासाठी ट्रिंगोसह अनेक प्रकारचे नाविन्य आणले आहे.

ट्रिंगो फार्म इक्विपमेंट रेंटल बिझनेस मॉडेल ही वैशिष्ट्यपूर्ण सुविधा शेतकऱ्यांना मालमत्तेत गुंतवणूक करू न देता प्रत्येक वापरानुसार पैसे देण्याची सोय देऊन यांत्रिकीकरण तंत्रज्ञान बसवण्यासाठी मदत करणार आहे. २०१६मध्ये दाखल झालेली ही पहिली संघटित कृषी उपकरण रेंटल सेवा आहे. खास करून भारतातील शेतकऱ्यांसाठी असलेली ही ट्रिंगो सुविधा फ्रेंचाइजी-आधारित मॉडेल म्हणून काम करते व ट्रॅक्ट रेंटल व्यवसायात प्रगत तंत्रज्ञान व डिजिटायझेशन परिणामकारकपणे आणते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link