Next
डॉ. कलमाडी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कार्यक्रम
प्रेस रिलीज
Thursday, March 29, 2018 | 02:08 PM
15 0 0
Share this story

आरती अंकलीकर–टिकेकरपुणे : ‘कन्नड संघाचे संस्थापक आणि पुणे शहराच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील एक महत्त्वाचे नाव असलेल्या डॉ. शामराव कलमाडी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त अनेकविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे,’ अशी माहिती कन्नड संघाचे अध्यक्ष कुशल हेगडे यांनी दिली.

ते म्हणाले, ‘कन्नड संघातर्फे पुढील वर्षभरात या उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत होणाऱ्या पहिल्या कार्यक्रमात ३१ एप्रिल २०१८ रोजी गायिका आरती अंकलीकर–टिकेकर, रजनी पच्छापूर आणि ख्यातनाम सतारवादक उस्ताद उस्मान खान यांचा ‘संगीत गुरू पुरस्कारा’ने सन्मान करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम एरंडवणे, गणेशनगर येथील डॉ. कलमाडी शामराव हायस्कूलच्या शकुंतला शेट्टी सभागृहात सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे.’          

रजनी पच्छापूरया कार्यक्रमात जयपूर अत्रौली घराण्याच्या ख्यातनाम गायिका आरती अंकलीकर–टिकेकर, प्रसिद्ध शास्त्रीय गायिका रजनी पच्छापूर आणि ख्यातनाम सतारवादक उस्ताद उस्मान खान यांना त्यांच्या सांस्कृतिक क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल ‘संगीत गुरू पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. मानपत्र, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप असून,शहरातील मान्यवर व्यक्ती कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. पुरस्कार वितरणानंतर आरती अंकलीकर–टिकेकर आणि कर्नाटकी शैलीतील गायकीसाठी प्रसिद्ध असलेल्या गायत्री वेंकटराघवन यांच्या संगीतिक जुगलबंदीचा कार्यक्रम देखील होणार आहे.   

उस्ताद उस्मान खान‘डॉ. शामराव कलमाडी हे पेशाने डॉक्टर होते; मात्र त्यांना शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात रुची होती. यातूनच कन्नड भाषिकांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी, या उद्देशाने त्यांनी १९५२ साली कन्नड संघाची स्थापना केली. त्या रोपाचे आज वटवृक्षात रूपांतर झाले असून, त्यांच्या  प्रेरणेने स्थापन झालेल्या या शैक्षणिक संस्थेत आज कानडी भाषिक विद्यार्थ्यांबरोबरच मराठी भाषिक विद्यार्थीही शिक्षण घेत आहेत. डॉ. कलमाडी यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. याचे औचित्य साधत कन्नड संघातर्फे अनेकविध शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. ३१ एप्रिल रोजी होणारा कार्यक्रम हा केवळ निमंत्रितांसाठी असणार आहे,’ असे आयोजकांमार्फत सांगण्यात आले आहे.

पुरस्कार वितरणाविषयी :

दिवस : ३१ एप्रिल २०१८
वेळ : सायंकाळी ५.३० वाजता
स्थळ : डॉ. कलमाडी शामराव हायस्कूलच्या शकुंतला शेट्टी सभागृह, एरंडवणे, गणेशनगर, पुणे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link