Next
‘आयआयटी बॉम्बे’ आणि ‘नेक्स्ट एज्युकेशन’ची भागीदारी
प्रेस रिलीज
Friday, June 29, 2018 | 04:53 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : भारतातील प्रमुख तंत्रज्ञान आधारित शिक्षण सोल्युशन्स पुरवठादार के-१२ विभागातील अग्रणी ‘नेक्स्ट एज्युकेशन’ने शिक्षणाचा दर्जा सुधारण्याच्या उद्देशाने तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी ‘आयआयटी बॉम्बे’शी भागीदारी केली आहे.

या अंतर्गत ‘आयआयटी बॉम्बे’ने विकसित केलेल्या आयआयटी बॉम्बेएक्स या ऑनलाइन मंचावरून शिक्षकांना दोन मॅसिव्ह ओपन ऑनलाइन कोर्सेस दिले जातील.   मॅसिव्ह ओपन ऑनलाइन कोर्सेस एक आणि दोन या दोन  अभ्यासक्रमांचा उद्देश संशोधन आधारित आणि विद्यार्थी-केंद्रित अध्यापनशास्त्राचा परिचय करून देणे आणि शालेय शिक्षणाशी माहिती व संपर्क तंत्रज्ञानाचा समन्वय साधणे हा आहे. के-१२ विभागात शिक्षणाचे परिणाम सुधारण्यासाठी शिक्षणात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग वाढविण्याचे ‘नेक्स्ट एज्युकेशन’चे ध्येय आहे.

विद्यार्थ्यांचा रस टिकवून ठेवणे, त्यांची क्षमता तपासणे, मोठ्या वर्गांना सांभाळणे आणि विद्यार्थ्यांना परीक्षा आणि चाचण्यांसाठी तयार करणे यांसारख्या बारमाही समस्यांसाठी माहिती व संपर्क तंत्रज्ञान हा प्रभावी उपाय असल्याचे आजकालच्या शिक्षकांना जाणवत आहे. हे अभ्यासक्रम शिक्षणाशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी शिक्षकांना मदत करतील. ‘वर्गामध्ये माहिती व संपर्क तंत्रज्ञानाच्या प्रभावी उपयोगासाठी अध्यापनशास्त्र’ हा अभ्यासक्रम २६ जुलै, २०१८ रोजी सुरू होऊन २२ ऑगस्ट २०१८ रोजी समाप्त होईल, तर ‘शाळांमध्ये संगणक शास्त्राचे प्रभावी शिक्षण’ हा दुसरा अभ्यासक्रम २६ ऑगस्ट २०१८ रोजी सुरू होईल.

नेक्स्ट एज्युकेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ब्यास देव रल्हन म्हणाले, ‘प्रभावी शिक्षणासाठी शिक्षकांना फक्त विषयाचे चांगले ज्ञान असणे पुरेसे नसते, तर ते ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावी रितीने पोहोचवणे देखील महत्त्वाचे असते. माहिती व संपर्क तंत्रज्ञानाच्या एकात्मतेमुळे शिक्षकांना शिक्षण केंद्रित वातावरण तयार करण्यास आणि शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील संवादाची पद्धत बदलण्यास मदत होईल.’

‘शिक्षकांना योग्य प्रशिक्षण देणे आणि वेगवेगळ्या क्षमता आणि आवडी असलेल्या विद्यार्थ्यांशी व्यवहार करणे, मोठे वर्ग सांभाळणे, आदींसारख्या त्यांच्या पुढे असलेल्या समस्यांना तोंड देण्यासाठी त्यांना मदत करणे हे आमचे ध्येय आहे. ‘आयआयटी बॉम्बेएक्स’ सोबतच्या आमच्या सहयोगाच्या माध्यमातून शिकवणे आणि शिकणे यामध्ये असणारी वर्तमान दरी भरून काढण्याचा आणि परिवर्तनशील शिक्षणाच्या दिशेने प्रवास करण्याचा आमचा उद्देश आहे,’ असे रल्हन यांनी सांगितले.

‘आयआयटी बॉम्बे’च्या काँप्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग विभागातील इंटरडिसीप्लिनरी प्रोग्राम इन एज्युकेशनल टेक्नॉलॉजी विषयाचे प्राध्यापक डॉ. श्रीधर अय्यर म्हणले, ‘माहिती व संपर्क तंत्रज्ञानाच्या प्रभावी उपयोगासाठी अध्यापनशास्त्रामुळे शिक्षक केंद्रित शिक्षणाची पारंपरिक पद्धत बदलून विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धत सुरू होऊ शकते. शिकवण्याच्या योग्य पद्धती तपासण्यासाठी आणि निवडण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण आणि माहिती व संपर्क तंत्रज्ञानाचे व्यापक ज्ञान मिळणे आवश्यक आहे. आमचा विश्वास आहे की, मॅसिव्ह ओपन ऑनलाइन कोर्सेसच्या माध्यमातून अधिकाधिक शिक्षकांना माहिती व संपर्क तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यासाठी आम्ही सक्षम बनवू, जेणेकरून ते शिकण्या-शिकवण्याच्या समस्यांना समर्थपणे तोंड देऊ शकतील.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search