Next
‘मार्ट’तर्फे कृषी पर्यटनावर व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम
BOI
Tuesday, February 05, 2019 | 03:42 PM
15 0 0
Share this article:

पुणे : कृषी पर्यटन क्षेत्रातील मागणी पुरवठा आराखडा लक्षात घेऊन ‘महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण पर्यटन सहकारी महासंघ मर्या. (मार्ट)’ने कृषी पर्यटनावर आधारित व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला आहे. यामध्ये कृषी पर्यटनाची गरज लक्षात घेऊन अभ्यासक्रमाची आखणी केलेली आहे. 

हवेली तालुक्यातील बहुली येथे असलेल्या ‘सह्याद्री कृषी पर्यटन केंद्रा’त आठ, नऊ व दहा फेब्रुवारी असे तीन दिवस हा प्रशिक्षण कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमात तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. कृषी व्यवसाय हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. कृषी पर्यटन हा त्यातीलच एक महत्त्वाचा भाग. पर्यटन हे रोजगार उत्पन्न करण्याचे एक प्रभावी माध्यम आहे. कृषी पर्यटन हा शेती पूरक व्यवसाय असल्यामुळे या उपक्रमास महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वाव आहे. 

शेतकऱ्यांना जोड उत्पन्न मिळवून देणारा व राष्ट्रीय उत्पादनात भर घालणारा उद्योग म्हणून कृषी पर्यटनाकडे पाहता येईल. शासनाच्या कृषी पर्यटनातील सकारात्मक धोरणांवर या व्यवसायास भविष्यकाळात उत्तम वाव आहे. आजच्या परिस्थितीत शेतीमालाचे अनिश्चित बाजारभाव, नैसर्गिक असमतोल यांमुळे शेतीला जोडव्यवसाय म्हणून ‘कृषी पर्यटन’ व्यवसाय शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या लाभदायी ठरला आहे. या व्यवसायाची व्याप्ती आणि त्यामधील तांत्रिक ज्ञान शेतकऱ्यांना असणे गरजेचे आहे. यासाठी ‘मार्ट’ने कृषी पर्यटन व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यात औषधी वनस्पती आणि योग यांचाही समावेश करण्यात आला आहे. या विषयावर वनस्पतीतज्ज्ञ डॉ. मंदार अक्कलकोटकर तसेच ‘मार्ट’ अध्यक्ष बाळासाहेब बराटे यांचेही मार्गदर्शन लाभणार आहे. 

अधिक माहिती व प्रवेशासाठी 
मार्ट कार्यालय, शुक्रवार पेठ, शिवाजी रस्ता, पुणे
मोबाईल : ९९७५१ ०४२४३, ७२४९८ २१५८६
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
गणेश आवारी About 137 Days ago
पुन्ह। कधी आहे प्रशिक्षण
0
0

Select Language
Share Link
 
Search