Next
महापालिकेकडून तत्परतेने मिळालेल्या मदतीमुळे पूरग्रस्तांना दिलासा
BOI
Wednesday, September 11, 2019 | 05:21 PM
15 0 0
Share this article:


पुणे : पुराचा फटका बसलेल्या नदीकाठच्या भिडे पूल परिसरातील नागरिकांना पुणे महानगरपालिकेतर्फे रोख रक्कम आणि अन्नधान्याची मदत देण्यात आली आहे. शासकीय व प्रशासकीय यंत्रणेकडून तत्परतेने मिळालेल्या या मदतीमुळे नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. 

गेल्या महिन्यात अतिवृष्टीमुळे धरणातील विसर्ग वाढवण्यात आल्याने मुठा नदीच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाली आणि हे पाणी नदीकाठी असलेल्या वस्तीतील अनेक घरांमध्ये शिरले. विसर्ग वाढवण्यात येणार असल्याने नागरिकांन मौल्यवान सामान हलवण्याबाबत आणि सुरक्षित स्थळी आसरा घेण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या होत्या. त्यामुळे नागरिकांनी शक्य ते साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवले होते; मात्र सर्व सामान हलवणे शक्य न झाल्याने अनेकांच्या घरातील सामानाचे, अन्नधान्याचे नुकसान झाले. घरांचेही नुकसान झाले. हे नुकसान भरून काढण्यासाठी शासनातर्फे तत्काळ पाहणी करून आर्थिक मदत जाहीर करण्यात आली. ही मदत कधी मिळेल, याची वाट पाहणाऱ्या नागरिकांना अवघ्या पंधरा-वीस दिवसात मदत मिळाली आहे.

 

पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ या भागाला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी आवश्यक ओळखपत्रे घेऊन नागरिकांना वस्तीतील सभागृहात जमण्यास सांगितले आणि तिथे सर्वांना अन्नधान्याच्या मदतीचे वाटप करण्यात आले, तर पंधरा हजार रुपयांची आर्थिक मदत नागरिकांच्या थेट बँक खात्यात जमा झाली आहे. या कामात या भागातील नगरसेवक दीपक पोटे यांनी पुढाकार घेतला. वस्तीतील घरांमध्ये पाणी घुसल्यानंतर येथील नागरिकांनी जवळच्या शाळेत आश्रय घेतला होता. त्या वेळीदेखील त्यांना तातडीने अन्नधान्य व अन्य सेवासुविधा पुरविण्यात आल्या होत्या. 

‘सरकारने दिलेली ही मदत खूप मोलाची आहे. घराची दुरुस्ती, आवश्यक सामान आणण्यासाठी ही रक्कम उपयोगी येणार आहे,’ अशी प्रतिक्रिया या वस्तीतील केटरिंगचा छोटासा व्यवसाय चालवणाऱ्या मनीषा दहीभाते यांनी व्यक्त केली. 

वेळेत झालेल्या या मदतीमुळे वस्तीतील नागरिक प्रशासकीय यंत्रणेच्या कार्यतत्परतेबद्दल समाधान व्यक्त करत आहेत. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search