Next
मुंबईत रंगला ‘डिझाइन : इम्पॅक्ट अॅवॉर्ड्स’ सोहळा
प्रेस रिलीज
Thursday, July 26, 2018 | 01:38 PM
15 0 0
Share this article:पुणे : टायटन कंपनी लिमिटेड या कंपनीतर्फे नवीन उपक्रम आणि डिझाइनसाठी राबवण्यात आलेल्या उपक्रमाच्या ‘डिझाइन अॅवॉर्ड्स फॉर सोशल चेंज’ या अंतिम फेरीचे टाटा ट्रस्टच्या साह्याने नुकतेच आयोजन करण्यात आले होते. ९९३ प्रवेशिकांमधून गुणांकनाच्या अनेक कठीण फेऱ्यांनंतर आठ विजेत्यांची निवड करण्यात आली. ताज प्रेसिडंट येथे झालेल्या महाअंतिम फेरीमध्ये या विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली. विविध क्षेत्रातून आलेल्या या विजेत्यांना प्रत्येकी ६५ लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. या सर्व अनुदानांसह या उपक्रमात ५ कोटींचा निधी देण्यात येणार आहे.

‘टायटन’चा ‘डिझाइन : इम्पॅक्ट पुरस्कार’ हा प्रकल्पावर आधारित अनुदान देणारा पुरस्कार आहे. वंचित समाज आणि गरजू लोकांमध्ये सकारात्मक बदल घडावा, तसेच या प्रतिभावान लोकांना डिझाइन करण्यासाठी प्रेरणा मिळावी आणि त्याचा फायदा भारतीय समाजाला व्हावा, असे या पुरस्काराचे ध्येय आहे. भारतीयांना होणाऱ्या मूत्रमार्गाच्या (युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन-यूटीआय) आजारांमधील ९६ टक्के आजार ज्यामुळे होता अशा चार मुख्य युरोपॅथोजेन्सला शोधणाऱ्या क्रेडिट कार्डाच्या आकारातील तपासणी साधनाचा म्हणजेच ‘यूसेंस’ या तपासणीचा आठ विजेत्यांमध्ये समावेश आहे.

पुण्यातील या संशोधनातील चार कोपऱ्यात असलेल्या खळग्यांमदये विशिष्ट प्रकारच्या बॅक्टेरियाला प्रतिसाद दिला जातो. अतिशय सुटसुटीत आणि लहान डिझाइन आणि वापरण्यास सोपे अशा ‘यूसेंस’मध्ये जीवाणूंची विविध प्रकारची चाचणी केली जाते. सध्या यासाठी असलेल्या पद्धतींसाठी अधिक प्रमाणात लॅबोरेटरीजची गरज आहे. शिवाय, या चाचण्या तिथे प्रत्यक्ष जाऊन प्रशिक्षित कर्मचाऱ्यांविना होत नाहीत; मात्र ‘यूसेन्स’मुळे ग्रामीण भागातील रुग्णांनाही यूटीआय निदानाची संधी उपलब्ध होते. ‘यूसेन्स’ला वीजपुरवठ्याची गरज नाही, ते अतिशय परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहे आणि ते प्रत्यक्ष वापरता येत असल्याने सध्याच्या कल्चर आणि यस/नो स्ट्रीप्सच्या तुलनेत फारच चांगला पर्याय आहे.

अंतिम फेरीला सुरुवात करताना, टायटन कंपनी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक भास्कर भट म्हणाले, ‘आपल्या सेवेतून समाजाचे देणे फेडणे हे टाटा ग्रुपचे मिशन लक्षात ठेऊनच आमच्या संस्थेने हा उपक्रम राबवला आहे. आमच्याकडे जवळपास एक हजार प्रवेशिका आल्या तेव्हा आम्हाला समजले, की अर्थपूर्ण डिझाइन तयार करणारे इतके प्रचालक आहेत आणि त्याचा समाजावर सकारात्मक परिणाम होत आहे आणि हे समजल्यावर आम्हाला नक्कीच आनंद झाला आहे. डिझाइनवर भर देणारी आपली नवीन उत्पादने मांडण्याची संधी त्यांना या उपक्रमामुळे मिळाली. समाजाचे देणे फेडण्यासाठी टायटनने नेहमीच महत्त्वाच्या गोष्टी केल्या आहेत आणि यापुढेही ‘डिझाइन : इम्पॅक्ट पुरस्कार’ विजेत्यांबरोबर आम्ही काम करू आणि बदल घडवण्यासाठी त्यांना पाठिंबा देऊ.’

‘डिझाइन : इम्पॅक्ट पुरस्कार’ सोहळ्याच्या महाअंतिम फेरीत डिझाइनचे महत्त्व विषद करताना टायटन कंपनी लिमिटेडच्या प्रमुख डिझाइन अधिकारी रेवथी कांत म्हणाल्या, ‘टायटनच्या संपूर्ण कार्यात डिझाइनला सर्वात जास्त महत्त्व आहे. केवळ प्रत्यक्ष दिसण्यापेक्षाही कितीतरी गोष्टी डिझाइनमध्ये असतात असा आमचा विश्वास आहे. सौंदर्य आणि प्रक्रिया यांचे योग्य समीकरण असेल, तर ते उत्पादन सुंदर होतेच, शिवाय ते वापरण्यासाठीही सोपे बनते. या उपक्रमासाठी प्रवेशिका निवडताना सर्वांसाठी डिझाइन हे प्रमुख प्रमाण ठेवण्यात आले होते. सर्व प्रचालकांचे डिझाइन तत्त्वज्ञान मजबूत आहे आणि यापुढेही ते तसेच राहील याची आम्हाला खात्री करून घ्यायची होती. समाजातील मोठ्या घटकाला ही उत्पादने सेवा देतात, यामुळेच तिचे डिझाइन सामर्थ्यशील असावे, असा आमचा विश्वास असतो.’

विजेत्यांचे स्वागत करताना टायटन कंपनी लिमिटेडच्या कॉर्पोरेट सस्टेनबिलिटीचे प्रमुख एन. ई. श्रीधर म्हणाले, ‘आम्ही जे काही काम करतोय, अगदी उत्पादन विकास करणे असो, की रिटेलचा अनुभव ते मार्केटिंग कँपेन आणि सीएसआर राबवणे असो, या सर्व कामांमध्ये नावीन्यपूर्णतेला टायटनने नेहमीच महत्त्व दिले आहे. टायटनमध्ये सीएसआर म्हणजे जीवनाचा मार्ग आहे. या पुरस्कारात, उपेक्षित किंवा वंचित समाजातील भारतीय डिझायनर आणि प्रचालक यांना एकाच छताखाली आणण्याचा आणि त्यांना जास्तीत जास्त समाजापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.’

‘सकारात्मक सामाजिक परिणाम घडवणाऱ्या प्रचालकांना पाठिंबा देण्याच्या ‘टायटन’च्या उपक्रमाचा भाग होणे अतिशय आनंदाचे आहे. संपूर्ण भारतभरातील प्रचालकांसाठी खुल्या असणाऱ्या या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद लाभला आणि एकूण ९९३ प्रवेशिका आल्या, हे अतिशय आऩंददायी चित्र होते. यापैकी सर्व १८ अंतिम स्पर्धकांचे नवीन उपक्रम दमदार होते, त्यांच्यातून परीक्षकांना आठ विजेत्यांची निवड करण्याचे कठीण काम पार पाडावे लागले. ‘डिझाइन : इम्पॅक्ट पुरस्कार’ला अतिशय मोठे यश लाभले आहे,’ असे श्रीधर यांनी नमूद केले.

परीक्षकांच्या मंडळाकडून अंतिम विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली. परीक्षकांमध्ये मूळ नाविन्यपूर्णतेतील स्कॉलर आणि हनी बी नेटवर्कचे संस्थापक प्रो. अनिल गुप्ता, डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, मद्रास, रेल्वे मंत्रालयाचे प्रमुख सल्लागार आणि संशोधन आणि विकास पद्मश्री डॉ. अशोक झुनझूनवाला, नाविन्यपूर्णता आणि उत्पादनाचा विकास यासाठीच्या उद्योगक्षेत्रातील शैक्षणिक संवादामधील अग्रेसर सर दोराबजी टाटा ट्रस्टचे विश्वस्त पद्मश्री व्ही. आर. मेहता, टाटा सन्सचे ब्रँड कस्टोडियन हरीश भट, सिरियल स्पेस आंत्रप्रेन्यूअर आणि अर्थटूऑर्बिटच्या सहसंस्थापक आणि सीईओ सुनिता मोहंती, अहमदाबादमधील रिव्हरसाइड स्कूलच्या संस्थापक आणि डिझाइन फॉर चेंजच्या संस्थापक किरण बीर सेठी आणि सामाजिक प्रचालक आणि उद्योजक आणि अगस्त्य इंटरनॅशनल फाउंडेशनचे संस्थापक आणि अध्यक्ष रामजी राघवन आदी मान्यवरांचा सहभाग होता.

(Please click here to read this news in English.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search