Next
‘महाबँके’च्या ८४व्या स्थापनादिनी ७५ कॅश रिसायकलर्स सुरू
प्रेस रिलीज
Tuesday, September 18, 2018 | 04:50 PM
15 0 0
Share this story

बँक ऑफ महाराष्ट्रच्या ८४व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विद्यार्थांना गौरविताना मान्यवर.

पुणे : ‘बँक ऑफ महाराष्ट्रच्या ८४ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून ७५ कॅश रिसायकलर्स सुरू करून एटीएम सुविधेस नव्या तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली आहे. आगामी काळात बँक प्रतिकूल परिस्थितीवर मात करून नफा मिळवण्याकडे वाटचाल करेल,’ असा विश्‍वास बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक डॉ. एम. व्ही. पटवर्धन यांनी व्यक्त केला.

बँकेच्या पुणे येथील मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमास डॉ. पटवर्धन मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. या वेळी नामवंत उद्योगपती, तसेच विविध क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तीही उपस्थित होत्या.

डॉ. पटवर्धन म्हणाले, ‘देशाच्या विकासातील बँक ऑफ महाराष्ट्रचा सहभाग उल्लेखनीय आहे. नव्या बँकिंग संरचनेतील स्थित्यंतर आणि नव्याने आलेले नियम यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या ताळेबंदात वेगाने परिवर्तन होत आहे. देश सध्या जगातील वेगाने वाढणार्‍या अर्थव्यवस्थेचा भाग होत असल्याने भारतीय बँकिंग व्यवस्थाही वेगाने वाढत आहे.’

वर्धापनादिनाच्या निमित्ताने राज्यभरात ७५ कॅश रिसायकलर्स सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. ही सुविधा एटीएएमसोबत प्राप्त होणार आहे. एटीएमच्या सध्याच्या पैसे काढणे, पिन नंबर बदलणे, रक्कम ट्रान्स्फर करणे या सुविधांबरोबर एटीएम कार्डासह किंवा कार्डाविना दोन हजार रुपये, ५००, २००, १०० आणि ५० रुपयांच्या कमाल २०० नोंटांचा गठ्ठा (बंडल) जमा करता येणार आहे.

या प्रसंगी बोलताना बँकेचे कार्यकारी संचालक ए. सी. राऊत म्हणाले, ‘बँकेच्या संस्थापकांनी उभा केलेला मजबूत पाया, बँकेच्या कर्मचार्‍यांनी मेहनत आणि ग्राहकांचा विश्‍वास यावर बँकेची मोठी भिस्त आहे. ९१३५ साली स्थापन झालेल्या बँकेच्या देशभरात एक हजार ८४६ शाखा, एक हजार ८७४ एटीएम, २.६ कोटी ग्राहक आणि तेरा हजार कर्माचारी आहेत. सर्वांच्या आर्थिक गरजा एकाच ठिकाणी पूर्ण करणारे बँक हे प्रमुख केंद्र आहे. ८४ वर्षांची वाटचाल पूर्ण करीत असताना ग्राहकांना तत्पर सेवा प्रदान करतानाच बँकेचे सर्वच कामकाज ग्राहकाभिमुख करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहेत. काही प्रतिकूल परिस्थिती निर्माण होऊनही बँक आता नफा कमविण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे, त्याद्वारेच ग्राहक, भागधारक, हितचिंतक आणि कर्मचारी यांचे प्रेम आणि जिव्हाळा जपण्याचा बँकेचा प्रयत्न आहे.’

या वेळी बँकेतर्फे डॉ. पटवर्धन यांच्या हस्ते पुणे महानगरपालिकेच्या शाळेतील (पीसीएमसी) दहावी, बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा महा-मेधावी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. शहरातील विद्यार्थ्यांना प्रथम दर्जाचे शिक्षण देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या या शाळांच्या मुख्याध्यापकांचाही सन्मान करण्यात आला.

या वेळी ज्येष्ठ संगीतकार आणि गायक राहुल घोरपडे आणि त्यांच्या समूहाने मनोरंजनाचा कार्यक्रम सादर केला. संसाधन नियोजन विभागाचे महाप्रबंधक एम. जी. महाबळेश्‍वरकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. पुणे शहर क्षेत्राचे महाप्रबंधक पी. आर खटावकर यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link