Next
डोंबिवलीत रंगणार राज्यस्तरीय आंबेडकरी साहित्य संमेलन
मिलिंद जाधव
Friday, May 24, 2019 | 01:14 PM
15 0 0
Share this article:

डोंबिवली : आंबेडकरी साहित्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा आणि नवोदित कवी-साहित्यिकांना विचारमंच उपलब्ध व्हावा या हेतूने भांडूप येथील विकास प्रबोधिनी या संस्थेतर्फे राज्यस्तरीय आंबेडकरी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे संमेलन २६ मे २०१९ रोजी डोंबिवलीतील केडीएमसी (पूर्व) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात होईल. 

संमेलनाचे अध्यक्षपद जेष्ठ साहित्यिक डॉ. विठ्ठल शिंदे भूषविणार असून, जेष्ठ साहित्यिक प्रा. शुक्राचार्य गायकवाड  यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून अॅड. ओमप्रकाश मौर्या उपस्थित असणार आहेत. स्वागताध्यक्ष म्हणून विकास प्रबोधिनी संस्थेचे अध्यक्ष साहित्यिक श्रीकृष्ण टोबरे असणार आहेत. कवी मिलिंद जाधव सूत्रसंचालन करणार असून, अॅड. प्रज्ञेश सोनावणे आभार प्रदर्शन करणार आहेत.

कवयित्री सुरेखा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली महिला परिसंवाद होणार असून, यात समीक्षक, परीक्षक अरविंद सुरवाडे व प्रा. डॉ. कल्याणी शेजवळ सहभागी होणार आहेत. या परिसंवादाचे सूत्रसंचालन कवी संघरत्न घनघाव करणार असून, आभार कवयित्री मनिषा मेश्राम करणार आहेत. 

यानंतरचा परिसंवाद कवी नवनाथ रणखांबे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, यात प्रा. डॉ. शहाजी कांबळे, प्रा. परमेश्वर माटे सहभागी होतील. या परिसंवादाचे सूत्रसंचालन कवी मारुती कांबळे करतील आणि कवी रवींद्र आडके आभार मानतील. कार्यक्रमाचा समारोप कवी संमेलनाने होईल. हे कवी संमेलन साहित्यिक जगदेव भटू यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून कवी दीप उपस्थित राहणार आहेत. यात विविध ठिकाणांहून कवी, कवयित्री सहभाग घेणार असून, आंबेडकरी चळवळीच्या दर्जेदार कविता प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहेत. 

‘आज भारतात असहिष्णूता कमालीची वाढली आहे. लोकशाही संकटात सापडली आहे. संविधान धोक्यात आहे. हे वातावरण बहुजन समाजाच्या हिताला, प्रगतीला व विकासाला बाधक आहे. म्हणून समस्त मानवाच्या कल्याणाचा विचार करणारा आंबेडकरवाद समजून घेण्याची, त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याची आज खऱ्या अर्थाने गरज आहे. या धेय्याने प्रेरित होऊन विकास प्रबोधिनीने आंबेडकरी साहित्य संमेलमाचे आयोजन केले असून या संमेलनाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,’ असे आवाहन विकास प्रबोधिनीचे अध्यक्ष टोबरे यांनी केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search