Next
‘युवा’तर्फे मॉरिशस येथे व्यावसायिकांची परिषद
प्रेस रिलीज
Friday, March 16 | 05:34 PM
15 0 0
Share this story

युवाकॉनबाबत माहिती देताना  अजय कुलकर्णी, कृष्णा कुर्डूकर, मंजूषा वैद्य, श्रीकांत जोशी, धनश्री जोग.
पुणे : ‘शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाच्या याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान (युवा) संस्थेच्यावतीने ‘युवाकॉन २०१८’ ही व्यावसायिकांची वार्षिक परिषद यंदा बारा  एप्रिल  रोजी मॉरिशस येथे भरणार आहे. नवउद्योजकांना संघटित करून प्रशिक्षण देणे व त्यांना व्यवसाय वृद्धीसाठी सहकार्य करण्याच्या हेतूने या परिषदेचे आयोजन करण्यात येते’, अशी माहिती संस्थेचे श्रीकांत जोशी व मंजुषा वैद्य यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी धनश्री जोग, कृष्णा कुर्डुकर, अजय कुलकर्णी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

श्रीकांत जोशी म्हणाले, ‘भारताबरोबरच परदेशातील व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी, तसेच नवीन नेटवर्किंग तयार करणे, कर्ज सुविधा उपलब्ध करून देणे असे अनेक उपक्रम ‘युवा’तर्फे दरवर्षी राबविले जातात. ‘युवा’तर्फे आयोजित केली जाणारी ही दुसरी व्यावसायिकांची परिषद आहे. गेल्या वर्षी चार फेब्रुवारी रोजी दुबई येथे या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यात दोनशे पन्नास उद्योजक सहभागी झाले होते. एका दिवसात जवळपास सत्तेचाळीस  कोटींची उलाढाल यातून झाली होती. या परिषदेला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादातून प्रेरणा घेऊन यंदा ही परिषद मॉरिशस येथे भरविण्यात येत आहे.’

‘फूड, अॅग्रो प्रॉडक्ट्स, आयटी, शिक्षण, सेवा आणि इतर क्षेत्रातील जवळपास शंभराहून अधिक उद्योजक यामध्ये सहभागी होणार आहेत. ‘मेक इन इंडिया’ व ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’मध्ये सहभागी झालेले काही उद्योजक या परिषदेत सहभागी होत आहेत. मॉरिशसमधील उद्योजकांबरोबर नेटवर्किंग व उद्योगवृद्धीची संधी भारतातून जाणाऱ्या उद्योजकांना ‘युवाकॉन’द्वारे मिळणार आहे. त्यामुळे इच्छुक व होतकरू उद्योजकांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन आम्ही सर्व युवा उद्योजकांना करत आहोत,’ असे कृष्णा कुर्डूकर यांनी नमूद केले.

‘युवाकॉन’मध्ये मॉरिशसचे विविध क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित असणार आहेत. ‘युवा’ उपक्रम गेल्या दहा वर्षांपासून सुरु आहे. यंदाच्या परिषदेत सहभागी होणाऱ्या  उद्योजकांसाठी कर्जसहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. ज्यामुळे उभरत्या उद्योजकांना याचा लाभ घेता येईल. अधिक माहितीसाठी www.yuvaonline.org या संकेतस्थळाला भेट द्यावी, असेही या वेळी आयोजकांनी सांगितले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link