Next
‘आयसीआयसीआय’तर्फे ट्रॅव्हल कार्ड तात्काळ रिलोड सेवा
प्रेस रिलीज
Monday, May 21, 2018 | 05:04 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : एकत्रित मालमत्तेच्या बाबतीत भारताच्या खासगी बँक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या आयसीआयसीआय बँकेने ग्राहकांना ‘आयसीआयसीआय बँक ट्रॅव्हल कार्ड’मध्ये तत्काळ परकीय चलन भरण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. बँकेचा इंटरनेट बँकिंग प्लॅटफॉर्म आणि मोबाइल बँकिंग अॅप, आयमोबाइल वापरून या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.

ग्राहकांना त्यांच्या आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी डिजिटल पद्धतीने आणि कोणत्याही कागदपत्रांशिवाय त्यांचे ट्रॅव्हल कार्ड परकीय चलनाने तत्काळ रिलोड करता येणार असून, या नव्या सेवेमुळे आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे. विशेष म्हणजे, ग्राहकांना त्यांचे पालक, मुले किंवा जोडीदारासारख्या जवळच्या नातेवाईंकाचे ट्रॅव्हल कार्डही रिलोड करता येईल किंवा त्यांचे हे कार्ड आपल्या बचत खात्याशी जोडता येईल.

प्रवासात असताना ट्रॅव्हल कार्डचे व्यवस्थापन अधिक सोयीस्कर आणि विना अडथळा व्हावे यासाठी बँकेने त्यांच्या इंटरनेट बँकिंग प्लॅटफॉर्म आणि मोबाइल बँकिंग अॅपवर विविध सेवा उपलब्ध केल्या आहेत. या सेवांमुळे ग्राहकाला ट्रॅव्हल कार्ड बंद-सुरू करता येते. मिनी स्टेटमेंट पाहता येते, ई-मेल आयडी व मोबाइल क्रमांक अद्ययावत करता येतो. अशा प्रकारच्या सेवांमुळे ग्राहकांचा अनुभव समग्र आणि आरामदायी होण्यास मदत होते. त्याशिवाय बँकिंग क्षेत्रात पहिल्यांदाच बँकेने काही दिवसांपूर्वी आपल्या इंटरनेट बँकिंग प्लॅटफॉर्मद्वारे ट्रॅव्हल कार्डवरील रक्कम त्याला जोडलेल्या बचत खात्यात परत देण्याची सुविधा सुरू केली.

सध्या सुरू असलेला पर्यटन हंगाम ग्राहकांसाटी आणखी आनंददायी व्हावा यासाठी बँकेने प्रमोशनल ऑफर सुरू केली आहे, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला ट्रॅव्हल कार्ड ऑनलाइन सुविधा वापरून रिलोड करताना परकीय चलनाच्या एक्सचेंज दरावर ४० पैसे सवलत मिळू शकते. कार्डवरयूएसडी, एयूडी, एसजीडी, सीएडी, सीएचएफचे किमान एक हजार युनिट्स किंवा ईयूआर आणि जीबीपीचे ८५० युनिट्स लोड केल्यास ही सवलत लागू होईल. ही ऑफर १५ जुलै २०१८पर्यंत सुरू राहणार आहे.

आयसीआयसीआय बँकेचे कार्यकारी संचालक अनुप बागची म्हणाले, ‘आयसीआयसीआय बँकेने आपल्या सेवा ग्राहकांसाठी सोयीस्कर असतील यावर कायम भर दिला आहे. गेल्या काही वर्षांत परदेशात प्रवास करणाऱ्या भारतीयांची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढली आहे. हे लक्षात घेऊन आम्ही बँकेच्या ट्रॅव्हल कार्डावर विविध नव्या सुविधा आणि फायदे समाविष्ट केले आहेत. यातून ग्राहकांना परदेशात प्रवास करताना परकीय चलन सुरक्षित व सोयीस्करपणे सोबत ठेवता येणार आहे. यामुळे ग्राहकांना जगभरात कुठेही प्रवास करताना प्रवासाशी संबंधित खर्चाचे सहज व्यवस्थापन करता येणार आहे. अशाप्रकारच्या नाविन्यपूर्ण सेवांतून ग्राहकांना सुधारित बँकिंग अनुभव देण्याची आमची बांधिलकी अधोरेखित होते, असे आम्हाला वाटते.’

सध्या अँड्रॉइडवर आधारित स्मार्टफोन्सवर ही सेवा उपलब्ध असून, ग्राहकांना त्यांचे इंटरनेट बँकिंग खाते किंवा आयमोबाइल हे बँकेचे मोबाइल बँकिंग अॅप्लिकेशन त्यांच्या आयसीआयसीआय बँक बचत खात्याला जोडून सहज वापरता येईल. लवकरत ही सुविधा आयओएस स्मार्टफोन्ससाठीही उपलब्ध केली जाईल.

ट्रॅव्हल कार्ड जोडण्याबरोबरच ग्राहकांना इंटरनेट बँकिंग-आयमोबाइल अपवर लॉगइन करा, फॉरेक्स आणि ट्रॅव्हल कार्ड/कार्ड्स, लोन्स आणि फॉरोक्समध्ये जा, लिंक केलेले जे कार्ड रिलोड करायचे आहे ते निवडा आणि रिलोड पर्यायावर क्लिक करा, चलन आणि रकमेचे तपशील भरून सबमिटवर क्लिक करा या चार सोप्या पायऱ्यांमध्ये इन्स्टंट रिलोड रिक्वेस्ट करता येणार आहे. जवळच्या नातेवाईकांचे ट्रॅव्हल कार्ड रिलोड करण्यासाठी ग्राहकाला त्या व्यक्तीबरोबर असलेल्या नात्याचा मान्यताप्राप्त पुरावा दाखल करावा लागणार आहे.

आयसीआयसीआय बँक ट्रॅव्हल कार्ड हा परदेशात प्रवास करताना परकीय चलनाऐवजी जवळ बाळगता येण्यासारखा स्मार्ट, किफायतशीर, सोयीस्कर आणि सुरक्षित पर्याय आहे. त्यात १५ चलने रिलोड करता येऊ शकतात. त्याचबरोबर मुख्य कार्ड हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास अथवा खराब झाल्यास ग्राहकाला कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय तात्काळ सक्रिय होणारे बदली कार्ड पुरवणारी आयसीआयसीआय ही एकमेव बँक आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search