Next
‘अंधश्रद्धेपोटी एकविरा देवीसमोर पशुबळी देऊ नये’
डॉ. कल्याण गंगवाल यांचे आवाहन
प्रेस रिलीज
Friday, April 12, 2019 | 05:31 PM
15 0 0
Share this article:

डॉ. कल्याण गंगवालपुणे : ‘देव-देवतांच्या यात्रेदरम्यान बकरे, कोंबडे यांसह इतर प्राण्यांचा बळी दिला जातो; मात्र हे सगळे प्रकार केवळ अंधश्रद्धेपोटी केले जात आहे. कोणत्याही देवाला पशूचा बळी देऊन नैवैद्य दाखविणे अपवित्र आहे. त्यामुळे भाविक भक्तांनी एकविरा देवीसमोर पशुबळी देऊ नये,’ असे आवाहन सर्व जीव मंगल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कल्याण गंगवाल यांनी केले.

महाराष्ट्रातील जागृत देवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कार्ला (लोणावळा) येथील कुलस्वामिनी एकविरा देवीची यात्रा सुरू आहे. देवीचा नवस फेडण्यासाठी अनेक भाविक बकरे, कोंबड्या आदींचा बळी देतात. पशुबळी देऊन तेथेच अन्न शिजवायचे आणि प्रसाद म्हणून त्याचे भक्षण करायचे. त्याचबरोबर मांसाहाराबरोबरच मद्यप्राशनही करायचे असा अघोरी प्रकार अनेकदा पाहायला मिळतो. एकविरा देवीसह तुळजापूरच्या भवानीमातेला, जेजुरीच्या खंडोबाला अशा प्रकारे पशुबळी देण्याची ही प्रथा अत्यंत चुकीची असून, भाविकांनी अशा रीतीने पशुबळी न देण्याचे आवाहन डॉ. गंगवाल यांनी केले.

या प्रथेविरोधात जनजागृती करण्यासाठी सर्व जीव मंगल प्रतिष्ठानतर्फे गेली अनेक वर्षे प्रयत्न केला जात आहे. काही देवस्थानांमध्ये सकारात्मक बदल झाले आहेत. यंदा यात्रेवेळी अनेक कार्यकर्ते तेथे जाऊन पत्रके वाटतील, तसेच प्रबोधनपर फलक लावण्यात येतील आणि भाविकांशी संवाद साधून मतपरिवर्तन करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे डॉ. गंगवाल यांनी सांगितले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, मंत्री, एकविरा देवी मंदिर ट्रस्टचे प्रमुख, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना या संदर्भात निवेदने देऊन हा प्रकार थांबविण्याची विनंती केली आहे. तसेच मंदिर प्रशासनाकडून कडक धोरण अवलंबण्याची मागणी असून, या वेळी पशुक्रुरता प्रतिबंध कायदा व मुंबई पोलीस कायद्याअंतर्गत उघड्यावर, मंदिर परिसरात पशुपक्ष्यांच्या बळी देणाऱ्यांविरोधात गुन्हे नोंदविणार असल्याची माहितीही डॉ. गंगवाल यांनी दिली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search