Next
‘व्होडाफोन फॅनटॅस्टिक ब्रेक्स’मध्ये पुण्याचे दोघे विजेते
प्रेस रिलीज
Monday, May 21, 2018 | 11:42 AM
15 0 0
Share this article:

सिद्धार्थ गुहा (डावीकडे) यांना आयफोन ७ देताना ‘व्होडाफोन इंडिया’चे महाराष्ट्र-गोवा विभागाचे बिझनेस प्रमुख आशिष चंद्रा.पुणे : यंदाच्या क्रिकेट हंगामाच्या काळात व्होडाफोनतर्फे आयोजित करण्यात आलेली राष्ट्रीय ‘व्होडाफोन फॅनटॅस्टिक ब्रेक्स’ स्पर्धा नांदे येथील सिद्धार्थ गुहा व हडपसरमधील ऋषिकेश मोरे या दोघांनी फेसबुकच्या माध्यमातून जिंकली आहे.

भारतीय नागरिकांना क्रिकेटचे भलतेच वेड आहे. त्यामुळेच ‘व्होडाफोन’ने आयोजित केलेल्या ‘फॅनटॅस्टिक ब्रेक्स’ स्पर्धेला क्रिकेटचे चाहते असलेल्या ‘व्होडाफोन’च्या ग्राहकांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि स्पर्धेच्या निमित्ताने आयफोन जिंकण्याची संधीही पटकावली. ‘फॅनटॅस्टिक ब्रेक्स’ स्पर्धा ही ‘व्होडाफोन’च्या ‘अनऑफिशिअल स्पॉन्सर ऑफ फॅन्स’ या मोहिमेचाच एक भाग आहे.

सिद्धार्थ गुहा हे ५९ वर्षांचे निवृत्त बॅंक कर्मचारी असून, ‘व्होडाफोन’चे ग्राहक आहेत. गुहा यांनी ‘आयफोन ७’ जिंकल्याचा फोन ‘व्होडाफोन’कडून आल्यानंतर त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. ‘व्होडाफोनच्या उत्कृष्ट सेवेमुळे मी या कंपनीचा कायमचा ग्राहक बनलो आहे. आयफोन जवळ बाळगण्याचे स्वप्न मी पाहिले होते. व्होडाफोनमुळे हे स्वप्न साकार झाले आहे. व्होडाफोनचे आभार मानण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत’, अशी प्रतिक्रिया गुहा यांनी व्यक्त केली.  

‘व्होडाफोन द अनऑफिशिअल स्पॉन्सर ऑफ फॅन्स’ या उपक्रमात नागरिकांना काही सोपे प्रश्न विचारून त्यांचे क्रिकेटविषयीचे ज्ञान पडताळून पाहिले जाते. ‘फॅनटॅस्टिक ब्रेक्स’च्या माध्यमातून या क्रिकेटवेड्यांना, क्रिकेटच्या फॅन्सना, तशी संधी दिली जाते व त्यांचे कौतुक केले जाते. ‘व्होडाफोन’च्या ग्राहकांना या स्पर्धेत भाग घेऊन आयफोन जिंकायचा असेल, तर त्यांनी क्रिकेट सामना सुरू असताना टीव्हीवर जाहिराती लागल्यावर, त्या ‘ब्रेक’च्या काळात विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे द्यायची आहेत. यासाठी त्यांनी ‘२०२#’ या क्रमांकावर कॉल करायचा अथवा ‘व्होडाफोन झुझू फेसबुक’च्या पेजवर लॉगिन करून तेथे आपली उत्तरे नोंदवायची आहेत. जाहिरातीच्या प्रत्येक ब्रेकमध्ये एक आयफोन जिंकण्याची संधी उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे इंग्लंडमध्ये लॉर्ड्सच्या मैदानावर जाऊन भारत व इंग्लंड यांच्यातील सामना प्रत्यक्ष पाहण्याची संधीही मिळणार आहे. विजेत्या स्पर्धकाला त्याच्या जोडीदारासह या राउंड ट्रीपची तिकिटे मिळणार आहेत.

‘व्होडाफोन इंडिया’चे महाराष्ट्र-गोवा विभागाचे बिझनेस प्रमुख आशिष चंद्रा यांनी ‘फॅनटॅस्टिक ब्रेक्स’ नागरिकांनी स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, ‘व्होडाफोन इंडियामध्ये आम्ही नाविन्यपूर्ण योजना आखतो व ग्राहकांना गंमतीचे व विविध अनुभव देत असतो. क्रीडा क्षेत्राशी ‘व्होडाफोन’चा नेहमीच जवळचा संबंध आलेला आहे. कोणत्याही क्रीडा सामन्यात त्या खेळाचा चाहता हाच खरा जीव लावत असतो व आनंद मिळवीत असतो. या चाहत्यांच्या या क्रीडा प्रेमाचे कौतुक करण्यासाठी ‘व्होडाफोन’ने विविध क्रीडा स्पर्धांना आपला ब्रॅंड पुरवला आहे व उत्तेजनही दिले आहे. ‘व्होडाफोन’च्या या प्रयत्नांची वाखाणणी क्रीडा चाहत्यांनी व कंपनीच्या ग्राहकांनी कायम केली आहे. ‘अनऑफिशिअल स्पॉन्सर ऑफ फॅन्स’ ही मोहीम ही याच धोरणाचा भाग आहे. ‘व्होडाफोन फॅनटॅस्टिक ब्रेक्स’ स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही खेळाच्या चाहत्यांना बक्षिसे तर देतोच, त्याशिवाय एक रोमांचकारी, अविस्मरणीय अनुभवही देतो. यातून आम्ही या चाहत्यांशी जवळकीचे नाते प्रस्थापित करीत असतो.’

(Please click here to read this news in English.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search