Next
सरसम येथे विवाह सोहळ्यात महापुरुषांच्या पुस्तकांचा आहेर
नागेश शिंदे
Thursday, June 06, 2019 | 12:54 PM
15 0 0
Share this article:


हिमायतनगर : तालुक्यातील सरसम येथे बनसोडे आणि दांडेकर या मातंग समाजातील दोन कुटुंबांनी विवाहात आप्तेष्टांना आहेर देण्याऐवजी महापुरुषांची पुस्तके भेट देऊन एक समाजासमोर वेगळा आदर्श ठेवला आहे. मातंग समाजातही चांगले परिवर्तन घडून येत असल्याचे हा उदाहरणावरून समोर आले आहे. 

मौजे सरसम येथील पार्वतीबाई संभाजी बनसोडे यांचे तृतीय पुत्र राजेश व अरुणा गंगाधर दांडेकर यांची जेष्ठ कन्या आरती यांचा विवाह सोहळा काही दिवसांपूर्वी पार पडला. हा विवाह सत्यशोधक विवाह पद्धतीने लावण्यात आला. या पद्धतीत मंगलाष्टकांऐवजी महापुरुषांच्या विचार गाथा माँ जिजाऊ, सावित्रीबाई फुले, शाहु-आंबेडकर, गाडगेबाबा आदी महामानवांच्या विचारधारेतील मार्गाचा अनुरोध करून वधू-वरांना प्रार्थना देऊन विवाह लावण्यात आला. या वेळी  अक्षतांऐवजी पुष्पवृष्टी करण्यात आली.


हा विवाह सत्यशोधक समाज महासभा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष के. एम. वाघमारे, समाजसेवक एम. आर. नकेवार यांच्या हस्ते झाला. बनसोडे परिवार सुशिक्षित आहे. या परिवाराने दोन वर्षांपूर्वी पवना बनसोडे या मुलाचा विवाह बौद्ध पद्धतीने लावला होता. राजेश आणि आरती यांच्या विवाहाप्रसंगी त्यांना नव जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी कै. देशमुख विद्यालयाचे अध्यक्ष शामरावजी देशमुख  सरसमकर, मुख्याध्यापक गजानन सूर्यवंशी, लोकडे, गोविंद गोखले, हदगाव तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक परमेश्वर गोपतवाड, पत्रकार गंगाधर वाघमारे, सोपान बोपीलवार, संजय कावडे, दत्ताभाऊ शीराणे, बापूराव आडे, सुनील गोखले, सुभाष दारवंडे, डाके, जाधव, संतोष खिल्लारे   यांच्यासह समाजातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 79 Days ago
Best wishes for happy married life .
0
0

Select Language
Share Link
 
Search