Next
‘पु. ना. गाडगीळ आणि सन्स’तर्फे अक्षय्य तृतीयेसाठी विशेष कलेक्शन
प्रेस रिलीज
Friday, April 06, 2018 | 06:11 PM
15 0 0
Share this story

पुणे :  सोन्याला आपल्याकडे समृद्धी समजले जाते आणि साडेतीन मुहूर्तांपैकी अक्षय्य तृतीया ही सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीसाठी सर्वोत्तम समजण्यात येते. त्यामुळेच अक्षय्य तृतीया व आगामी लग्नसराई लक्षात घेऊन पु. ना. गाडगीळ आणि सन्स लिमिटेडने दाक्षिणात्य शैलीवर आधारित दागिन्यांचे विशेष कलेक्शन बाजारात आणले आहे. यामध्ये कर्णफुले, पेडंट्स, झुमके, बांगड्या तसेच विविध प्रकारचे नेकलेस आहेत. 

याबाबत पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि.चे अध्यक्ष अजित गाडगीळ म्हणाले, ‘नवे कलेक्शन हाताने घडविण्यात आले असून, यामध्ये विविध रंगांचे पैलू पाडलेले खडे व मोत्यांचा वापर केला आहे. दागिन्यांची शैली ही दाक्षिणात्य दागिन्यांच्या शैलीवर आधारित आहे. हे दागिने लग्नसमारंभ व विशेष समारंभांसाठी नक्कीच योग्य, असे आहेत.’ 

‘ग्राहकांना सतत नवीन काही देण्याचा आमचा प्रयत्न असतो. यापूर्वी सादर केलेल्या उत्सव विविधतेचा, फेस्टिव्हल ऑफ डायमंड्स, लँटर्न कलेक्शनला भरपूर प्रतिसाद मिळाला. आता हे कलेक्शन आमच्या सर्व पंचवीस दालनांत पुणे (सातारा रोड, औंध, हॅपी कॉलनी (कोथरूड), सिंहगड रोड,चिंचवड व भोसरी),तर अमरावती, बीड, नाशिक, नाशिक रोड, नारायणगाव, नंदूरबार, पंढरपूर, सोलापूर,सातारा, संगमनेर, शिरूर, धुळे, कलबुर्गी (कर्नाटक), प्रभादेवी-मुंबई, वडोदरा (गुजरात), जळगाव, वर्धा,परभणी व उस्मनाबाद येथे उपलब्ध आहे,’ असे पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि.चे संचालक व सीईओ अमित मोडक यांनी नमूद केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link