Next
मॅरेथॉनमध्ये धावण्यापूर्वी...
BOI
Thursday, October 25, 2018 | 05:15 PM
15 0 0
Share this article:

मॅरेथॉनमध्ये भाग घेण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात; मात्र त्यासाठी काही पूर्वतयारी आवश्यक असते. बहुप्रतीक्षित पूनावाला क्लीन सिटी मॅरेथॉनच्या पार्श्वभूमीवर या संदर्भातील काही महत्त्वाच्या टिप्स जाणून घेऊ या पुढील लेखात.
...................................................................................
योग्य प्रशिक्षण घ्या : मॅरेथॉनमध्ये धावणे हे कठीण काम ठरू शकते आणि तुमचे शरीर तंदुरूस्त नसल्यास, मॅरेथॉन पूर्ण करणे कठीण होते; परंतु काही मार्गदर्शक आणि प्रशिक्षक तुम्हाला तुमचा आहार, वेळापत्रक, रेसिंग धोरण आणि हायड्रेशन या सर्वांबाबत मॅरेथॉनच्या अनेक आठवडे आधी मार्गदर्शन करतील.

तुमच्या आहारावर नियंत्रण ठेवा : स्पर्धेचा दिवस जवळ येतात, तसे तुम्हाला कर्बोदकांमधून जास्तीत-जास्त ऊर्जा साठवणे गरजेचे आहे. कमी जीआय कर्बोदकयुक्त आहार, प्रथिनयुक्त आणि फॅट कमी असेल, तर तुमच्या शरीराला त्या मॅरेथॉनसाठी आवश्यक ते सर्व पोषक घटक देईल.

भरपूर पाणी प्या : मॅरेथॉनच्या आदल्या दिवशी भरपूर पाणी प्‍यायल्याने शेवटच्या ओळीपर्यंत तुम्ही हायड्रेटेड राहाल; परंतु अति पाणी पिऊ नका कारण ते शरीराला घातक ठरेल.

शांत राहा आणि मजा करा : आणखी एक प्रशिक्षण सत्र घेऊन अति करणे, थकवा येणे यांच्यामुळे तुमच्यातील उत्सुकता कमी होऊन थकून जाल. शांत राहा, नीट झोप घ्या आणि मॅरेथॉनसाठी तयार व्हा.

योग्य कपडे घाला : मॅरेथॉनसाठी तुम्ही ज्या प्रकारच्या कपड्यांची निवड करता ते तुमच्या कामगिरीत महत्त्वाची भूमिका निभावतात. सहजपणे घाम न शोषणारे कपडे घातल्याने तुम्हाला उबदार वाटेल आणि तुम्ही लवकर डिहायड्रेट व्हाल व अपेक्षेपेक्षा खूप लवकर तुम्ही थकून जाल.


मॅरेथॉन पूर्ण झाल्यावर शरीराला नव्याने सज्ज करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पुन्हा एकदा सज्ज होण्यासाठी खाली दिलेल्या गोष्टी नक्की उपयुक्त ठरतील.

ऊर्जा पुन्हा मिळवा : मॅरेथॉन पूर्ण झाल्यावर पहिली गोष्ट केली पाहिजे ती म्हणजे थोड्या वेळानंतर हळूहळू खायला आणि प्यायला सुरूवात करा. शरीराचा थकवा टाळण्यासाठी चरबीयुक्त पदार्थ, तसेच सहजपणे पचन न होणारे पदार्थ टाळा.

चालत राहा : थकल्यामुळे सोफ्यावर बसून राहणे हा एक चांगला पर्याय ठरत नाही. आसपासच्या परिसरात चालत राहिल्याने स्नायूंवर ताण येत नाही.

मसाज-गोळ्या : गोळ्या प्रत्येक वेळी फायदेशीर ठरतीलच असे नाही, कारण थकवा भरून काढण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेत त्यांचा अडथळा होऊ शकतो. वेगवान सुधारणेसाठी हलका मसाज किंवा खेळाचा मसाज करू शकता.

मन भरेपर्यंत झोपा : मॅरेथॉन झाल्यानंतर भरपूर झोप घ्या.

हळूहळू जा, शांत व्हा : तुम्हाला नेहमीची धावण्याची सवय सुरू करण्याची उत्सुकता असेल; पण हळूहळू पुन्हा धावायला सुरूवात करा. साधारण काही आठवड्यांनी नेहमीच्या सवयीनुसार धावले पाहिजे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search