Next
‘इंडेक्स ईटीएफ’ मधील गुंतवणुकीत वाढ
प्रेस रिलीज
Saturday, June 30, 2018 | 06:08 PM
15 0 0
Share this story

 महावीर कासवापुणे :इंडेक्स ईटीएफ हा गुंतवणुकीचा एक उत्तम पर्याय आहे. थेट वेगवेगळ्या शेअर्समध्ये गुंतवणूक न करता; शेअर्समधील गुंतवणुकीचे लाभ देणारा हा मार्ग आहे. सर्वसामान्य लोकांमध्ये मात्र याबाबत फार जागरूकता नसल्याने, त्यांचे यातील गुंतवणुकीचे प्रमाण कमी आहे. तरीही गेल्या चार वर्षात यातील गुंतवणूकीचे प्रमाण ९५ पटीने वाढले आहे. ही सकारात्मक बाब आहे’, अशी माहिती ‘एस अँड पी बीएसई इंडसाईसेस’ कंपनीचे सहसंचालक आणि उत्पादन व्यवस्थापक महावीर कासवा यांनी दिली. 

ते पुढे म्हणाले, ‘डिसेंबर २०१३ ते डिसेंबर २०१७ या चार वर्षांच्या कालावधीमध्ये इक्विटी ईटीएफच्या  व्यवस्थापनाखालील मालमत्तेत (एयूएम) ९५ पटींनी वाढ झाली असून, ती ७४५ कोटी रुपयांवरून ७१ हजार १०९ कोटींवर गेली आहे. एकूण ईटीएफ (एक्सचेंज ट्रेडेड फंड्स) व्यवस्थापनाखालील मालमत्तेतही (एयूएम) गेल्या चार वर्षांत लक्षणीय वाढ झाली असून, ती आठ हजार कोटी रुपयांवरून ७७ हजार ८९७ कोटी रुपयांवर गेली आहे. त्यातील वार्षिक वाढीचा दर ७६.६ टक्के आहे. गोल्ड कमॉडिटी आधारित ईटीएफमध्ये मात्र लक्षणीय घट झाली आहे.’ 

‘इक्विटी ईटीएफ एयूएममध्ये लक्षणीय वाढ होण्यात भारत सरकारने आणलेल्या ‘भारत २२’ या सारख्या इंडेक्स ईटीएफ फंडाचे मोठे योगदान आहे. तसेच २०१५ मध्ये ‘ईपीएफओ’ने (एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन) एस अँड पी बीएसई ईटीएफमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. ईपीएफओने आता अशा ‘ईटीएफ’मधील गुंतवणूकीचे प्रमाण १५ टक्क्यांपर्यंत वाढवली आहे. ‘इंडेक्स ईटीएफ’मुळे गुंतवणुकदारांना कमी खर्च, पारदर्शक व वस्तूनिष्ठ   गुंतवणूकीचे साधन मिळते. यामध्ये अनेक चांगल्या कंपन्याच्या शेअर्समध्ये एकाच वेळी गुंतवणूक करता येते. ज्या इंडेक्सवर त्याची नोंदणी असेल त्यातील चढ उताराप्रमाणे गुंतवणुकीत चढ उतार होतात. यातील युनिटसच्या विक्रीसाठी म्युच्युअल फंडाप्रमाणे लॉक-इन पिरिअड संपेपर्यंत थांबावे लागत नाही. यामध्ये कमिशन द्यावे लागत नाही. ब्रोकरेज द्यावे लागत असले तरी ते अत्यंत कमी असते. त्यामुळे ‘एक्स्चेंज ईटीएफ’मध्ये गुंतवणूक करणे हा अत्यंत लाभदायी पर्याय आहे’, असे कासवा यांनी आवर्जून नमूद केले.

‘देशातील दोन प्रमुख शेअर निर्देशांकांसह अन्य अनेक निर्देशांकाचा माग ठेवणाऱ्या ‘एस अँड पी बीएसई’ने उत्तम पर्याय उपलब्ध केले आहेत. बीएसई सुधारित मूल्य, एस अँड पी बीएसई लाभांश उत्पादन, एस अँड पी बीएसई कमी अस्थिरता, एस अँड पी बीएसई दर्जा या निकषांवर निर्देशांकांची कामगिरी मोजली जाते. त्याचप्रमाणे वातावरणातील बदलाची जोखीम, सामाजिक अस्वस्थता, पर्यावरण, सामाजिक आणि प्रशासकीय घटक यांचे पद्धतशीरपणे विश्लेषण केले जाते व गुंतवणूक विश्लेषणात ग्राह्य धरले जाते’, असेही कासवा यांनी स्पष्ट केले.

(इंडेक्स ईटीएफमधील गुंतवणुकीबाबत सविस्तर माहिती देणारा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link