Next
‘आयएसएचआरएई’तर्फे चिलर कॉनक्लेव्हचे आयोजन
प्रेस रिलीज
Monday, July 23, 2018 | 04:56 PM
15 0 0
Share this article:

पुणे : इंडियन सोसायटी ऑफ हिटिंग रेफ्रिजरेटिंग अ‍ॅंड एअर कंडिशनिंग इंजिनीअर्स (आयएसएचआरएई) पुणे चॅप्टरतर्फे दुसर्‍या चिलर कॉनक्लेव्हचे येथील हॉटेल जेडब्ल्यू मॅरिएट येथे २५ जुलै २०१८ रोजी सकाळी ९:३० ते सायंकाळी सहा या वेळेत आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून ‘आयएसएचआरएई’चे नॅशनल प्रेसिडेंट इलेक्ट विक्रम मूर्ती उपस्थित राहणार आहेत.

या परिषदेमध्ये चिलर इंडस्ट्रीमधील अत्याधुनिक तांत्रिक विकास, उत्पादने, अ‍ॅप्लिकेशन आणि ऑटोमेशन या विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. या कॉनक्लेव्हमध्ये स्वराजच्या (एनजीओ) संस्थापक सदस्य गौरव शोरी (सस्टेनेबिलिटी इन इंडियन वे), ईऑन इंटीग्रेटेड बिल्डिंग डिझाइन कन्सल्टंटसचे व्यवस्थापकीय भागीदार आशिष राखेजा (अ‍ॅप्लिकेबिलिटी ऑफ चिलर्स), अल्फा लावल इंडियाचे प्रॉडक्ट आणि अ‍ॅप्लिकेशन मॅनेजर शैलेश पराडकर (परफॉर्मन्स सर्टिफिकेशन फॉर इम्प्रुव्हिंग एनर्जी इफिशियन्सी इन एचव्हीएसी इंडस्ट्री), किर्लोस्कर चिलर्स प्रा.लि.चे विक्री विभागाचे सहयोगी उपाध्यक्ष गौरांग दाभोळकर (कटिंग एज चिलर टेक्नोलॉजीज), क्रिस्तोपिया थर्मल एनर्जी स्टोरेज लॅबुन लि.चे व्यवस्थापकीय संचालक लॉरेंट रॉबर्ट (इनसाइट वॉटर कुल्ड अ‍ॅंड एअर कुल्ड स्क्र्यु चिलर्स), क्रिस्तोपिया एनर्जी सिस्टिम्स (आय) प्रा.लि.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी क्षमा जैन (एनर्जी एफिशिएंट सोल्युशन्स बाय केहेम्स) आणि अल्फा लावल इंडियाचे क्षेत्रीय विक्री व्यवस्थापक प्रमोद वजे (अल्फा लावल प्लेट हीट एक्सचेंजर्स इन एचव्हीएसी अ‍ॅप्लिकेशन) या तज्ज्ञांतर्फे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

परिषदेविषयी :
दिवस :
बुधवार, २५ जुलै २०१८
वेळ : सकाळी ९:३० ते सायंकाळी सहा
स्थळ : हॉटेल जेडब्ल्यू मॅरिएट, पुणे.  
सहभागी होण्यासाठी संपर्क :
मंगेश देशमुख : ९०४९१ ९४३०३
दीपक वाणी : ९८५०५ ३२७२१
सुरज रानडे : ८८८८८ ३४३३५
अनुश्री रिसवाडकर : ९९२२९ ८९२१९
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search