Next
पुण्यातील देसाई नेत्र रुग्णालयाचा इंग्लंडच्या राणीकडून होणार सन्मान
बकिंगहॅम पॅलेसमध्ये कार्यक्रम
BOI
Wednesday, October 09, 2019 | 05:09 PM
15 0 0
Share this article:


पुणे : लहान बाळांना कायमच्या अंधत्वापासून वाचवण्यासाठी पुण्यातील एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालयाने केलेल्या कामाची दखल इंग्लंडच्या राणीने घेतली असून, लंडनच्या बकिंगहॅम पॅलेसमध्ये २९ ऑक्टोबर २०१९ रोजी होणाऱ्या विशेष समारंभात या रुग्णालयाचा सन्मान होणार आहे. राणी एलिझाबेथ यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या सोहळ्यात डॉ. सुचेता कुलकर्णी हा सन्मान स्वीकारणार आहेत.

एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालयाने रेटिनोपॅथी ऑफ प्रिमच्युरिटी या लहान बाळांना अंधत्व आणणाऱ्या विकारावर उपचार मोहीम राबवून तीन वर्षांत दोन हजारांहून अधिक बाळांना कायमच्या अंधत्वापासून वाचवले आहे. त्यांच्या या कामाचे एलिझाबेथ यांनी कौतुक केले आहे. 

क्वीन एलिझाबेथ डायमंड ज्युबिली ट्रस्टने लाखो लोकांच्या डोळ्याचे आरोग्य सुधारण्यासाठी अनेक कॉमनवेल्थ देशांमध्ये काम केले आहे. भारत या समूहाचा सर्वात मोठा सदस्य आहे. एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय, एलिझाबेथ ट्रस्ट व राज्य आरोग्य विभागाने रेटिनोपॅथी ऑफ प्रिमच्युरिटी या लहान बाळांमध्ये आढळणाऱ्या रोगाची तपासणी व इलाज करण्यासाठी महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमधील सरकारी डॉक्टरांना प्रशिक्षण दिले. डॉ. सुचेता कुलकर्णी यांनी या मोहिमेचे नेतृत्व केले. या पथकाने तीन वर्षांत दोन हजारांहून अधिक बाळांची तपासणी केली आणि त्यांना कायमच्या अंधत्वापासून वाचवले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Lt Gen M A Tutakne About 6 Days ago
Well deserved Dr Sucheta Kulkarni. Keep the good work going.
0
0
M G Kadam About 6 Days ago
You richly deserve the honour. You have earned it. Wishing you good luck.
0
0

Select Language
Share Link
 
Search