Next
श्री भैरी देवस्थानतर्फे गायत्री, श्रेयाचा सत्कार
BOI
Tuesday, March 12, 2019 | 01:19 PM
15 0 0
Share this story

श्री भैरी देवस्थानतर्फे श्रेया तळेकर आणि गायत्री करंदीकर यांचा सत्कार करताना रवींद्र सुर्वे. सोबत मान्यवर.

रत्नागिरी : बारा वाड्यांचे ग्रामदैवत श्री देव भैरी देवस्थान ट्रस्टतर्फे शिक्षणमहर्षी (कै.) अरुअप्पा जोशी गुणवंत पारितोषिक गायत्री उदय करंदीकर व श्रेया स्वप्नील तळेकर या दोघींना प्रदान केले.

बारावीच्या परीक्षेत अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या गायत्रीने ९६.७७ टक्के गुण मिळवून कोकण बोर्डात वाणिज्य विभागात प्रथम क्रमांक पटकावला, तर ‘जीजीपीएस’च्या श्रेयाने दहावी परीक्षेत ९८.८० टक्के गुण मिळवून यश मिळवले. या दोघींना स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र व प्रत्येकी पाच हजार रुपये देऊन गौरविण्यात आले.

या वेळी विश्‍वस्त मंडळाचे अध्यक्ष रवींद्र तथा मुन्ना सुर्वे, उपाध्यक्ष राजेंद्र जोशी यांनी भैरी देवस्थानला विविध कामात मदत करणारे अ‍ॅड. संकेत घाग, बंड्याशेठ खातू, सुशील नाचणकर, दीपक ओतारी, चंद्रकांत मांडवकर, विजय पेजे, श्री. गुडगीकर आदींचा सत्कार केला. या वेळी अ‍ॅड. भाऊ शेट्ये, मनू गुरव, सर्व ट्रस्टी, मानकरी, गावकरी उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link