Next
रेशमी, सुती कपड्यांच्या खरेदीसाठी ‘फायबर टू सिल्क फॅब’
प्रेस रिलीज
Thursday, March 29, 2018 | 04:24 PM
15 0 0
Share this story

पुणे : उन्हाळ्यात विविध प्रकारचे तलम, सुती कपडे आणि लग्नसराईसाठी गर्भरेशमी साड्या, कपडे आदींची खरेदी करायची असेल, तर सध्या पुणेकरांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. कोथरूडमधील हर्षल हॉलमध्ये भरलेल्या सिल्क फॅब प्रदर्शनात विविध राज्यांच्या पारंपारिक वस्त्र शैलीतील अप्रतिम नमुने उपलब्ध आहेत. 

एकाच छताखाली थेट कारागिरांनी विक्रीला आणलेली ही वस्त्रे बघून खरेदीचा मोह न झाला, तरच नवल. आपल्या देशातील वैविध्यपूर्ण वस्त्रपरंपरा बघून थक्क व्हायला होते. महिलांसाठी तर इथे खजिनाच आहे. कांजीवरम, उपाडा, पैठणी यासह पश्चिम बंगालमधील पारंपारिक सुती साड्या, कांथा वर्क, डिझायनर साड्या, राजस्थान, गुजरातची खासीयत असलेल्या बांधणी साड्या, ड्रेस मटेरियल, कर्नाटकी कशिदाकाम असलेल्या रेशमी, सुती साड्या, खणाच्या कापडावरील कशिदाकाम असलेले ड्रेस मटेरियल, काश्मिरी पश्मीना सिल्कच्या साड्या, दुपट्टे, स्टोल्स, कुर्ते लक्ष वेधून घेतात. 

कलमकारी, पटोला डिझाइन असलेले सुती ड्रेस मटेरियल, खास उन्हाळ्यासाठी लखनौ चिकनकारी असणारे ड्रेस, ड्रेसमटेरियल,साड्या लक्ष वेधून घेतात. अत्यंत देखणी कलाकुसर, तलम कापड, नजर सुखावणारे आल्हाददायक पिवळा, गुलाबी, पिस्ता, निळा अशा रंगातील तयार कुर्ते, ड्रेस मटेरियल, साड्या बघून खरेदी केली नाही, असे होणे अशक्य आहे. उन्हाळा अगदी सुसह्य करण्यासाठी ही खरेदी केलीच पाहिजे. 

केवळ कपडेच नव्हे, तर वैविध्यपूर्ण दागिनेही येथे आहेत. नवनवीन डिझाइन्सचे दागिने नजर खिळवून ठेवतात. त्याचबरोबर आकर्षक कलाकुसर असलेली बेडशीट्स, बेडकव्हर्स, कुशन कव्हर्स, पर्सेस, सौंदर्यप्रसाधने असा वैविध्यपूर्ण खजिनाच येथे खुला झाला आहे. 

आणखी एक आगळावेगळी गोष्ट या प्रदर्शनात आहे ती म्हणजे थेट अफगाणिस्तानातून आलेली ड्रायफ्रूट्स. उत्तम दर्जाचा सुका मेवा अफगाणिस्तानातून भारतात आणून वेगवेगळ्या शहरात प्रदर्शनांमधून त्याची विक्री करणारे एक व्यापारी या प्रदर्शनात सहभागी झाले आहेत. खास बदाम, जर्दाळू, मलबेरी, मगज असा खासा माल त्यांच्याकडे उपलब्ध आहे. एरव्ही आपल्याकडे मिळणाऱ्या बदामाच्या दुप्पट आकाराचे बदाम त्यांच्याकडे आहेत. चवीला चांगला आणि आरोग्यदायी असलेला हा सुका मेवा थोडा महाग असला तरी नक्कीच किंमत वसूल करणारा आहे.

एकाच ठिकाणी रेशमी, सुती साड्या, ड्रेस मटेरियल, तयार कुर्ती, दागिने, गृह सजावटीच्या वस्तू किफायतशीर किंमतीत मिळत असल्याने काय घ्यावे आणि काय नको, असे इथे भेट देणाऱ्या महिला वर्गाचे होते. तेव्हा ही संधी चुकवू नका, या प्रदर्शनाला जरूर भेट द्या. एक एप्रिलपर्यंत सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत हे प्रदर्शन खुले आहे.
(‘फायबर टू सिल्क फॅब’या प्रदर्शनाची झलक दाखवणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link