Next
अनिल नेने यांचे वॉटरकलर आर्टवर्कचे प्रदर्शन
प्रेस रिलीज
Tuesday, January 29, 2019 | 02:08 PM
15 0 0
Share this storyऔंध : आर्किटेक्ट आणि आर्टिस्ट अनिल नेने यांचे वॉटरकलर आर्टवर्कचे प्रदर्शन २९ जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत औंध येथील रिलायन्स मार्टच्या  बाजूला पीएन गाडगीळ अँड सन्सच्या आर्ट गॅलरीमध्ये भरविण्यात आले आहे. सकाळी ११.३० ते संध्याकाळी ८.३० या वेळेत हे प्रदर्शन सुरू असेल.नेने यांचे हे तिसरे कला प्रदर्शन असून, ते सर्वांसाठी मोफत आहे. या प्रदर्शनामध्ये ४५ कलाकृती पाहायला मिळणार आहेत. या प्रदर्शनाची प्रमुख संकल्पना ‘निसर्ग’ आहे.  त्यामध्ये पाण्याचे झरे, पाऊस, हिरवळ, वन आणि ऋतू या विषयांचा समावेश आहे. विविध आंतरराष्ट्रीय पोर्टलवर आणि त्यांच्या स्वत: च्या वेबसाइटवरदेखील सध्या त्यांच्या कलेचे ऑनलाइन प्रदर्शन सुरू आहे.

प्रदर्शनाविषयी :
कालावधी : २९ जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०१९
वेळ : सकाळी ११.३० ते संध्याकाळी ८.३०
स्थळ : पीएन गाडगीळ अँड सन्सची आर्ट गॅलरी, रिलायन्स मार्टच्या  शेजारी, औंध.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link