Next
वार्षिक पुरवठेदार पुरस्‍कार सोहळ्यात ‘ब्रिजस्टोन’चा गौरव
प्रेस रिलीज
Friday, May 18 | 01:42 PM
15 0 0
Share this story

नॅशविल (टेनेस्‍सी) : ओरलँडो, फ्लॉरिडा येथे अलीकडेच जनरल मोटर्स (जीएम) आयोजित २६व्या वार्षिक पुरवठेदार पुरस्‍कार सोहळ्यामध्ये ब्रिजस्टोन कॉर्पोरेशन या जगातिक कंपनीला वार्षिक पुरवठादार म्‍हणून गौरविण्यात आले.  

कंपनीमध्ये सतत नाविन्य आणून उत्‍कृष्‍ट मूल्‍ये निर्माण करून जीएमच्या अपेक्षेपेक्षाही अधिक कामगिरी करणार्‍या, १७ देशांमधील १३२ सर्वोत्तम पुरवठादारांना जीएमने सन्मानित केले. १६ वेळा आणि सलग तीन वर्षे ‘ब्रिजस्‍टोन’ला हा पुरस्‍कार प्राप्त झाला आहे.  

अमेरिका आणि कॅनडासाठीचे, मूळ उपकरण विक्री, ‘ब्रिजस्‍टोन’ अमेरिकाचे टायर ऑपरेशन अध्यक्ष शॅनॉन क्‍विन म्‍हणाले, ‘जनरल मोटर्ससारख्या महत्त्वपूर्ण भागीदाराच्या अपेक्षेपेक्षाही अद्वितीय कामगिरी जागतिक स्‍तरावरील ‘ब्रिजस्‍टोन’चे कर्मचारी करीत असल्‍याचे या पुरस्‍कारामुळे दिसून येत आहे. गुणवत्ता आणि कामगिरीविषयीच्या कटीबद्धतेसाठीच नव्हे, तर जनरल मोटर्स आणि त्‍यांच्या ग्राहकांसाठी परिणामकारकता साधण्यावर लक्ष केंद्रित करण्यामुळे आमची निवड झाली हा आमचा सन्मानच आहे.’

यावर्षीच्या वार्षिक पुरवठादार पुरस्‍कार विजेत्‍यांपैकी ४५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्‍त २०१६ वर्षातील विजेते होते. क्विन आणि ‘ब्रिजस्‍टोन’चे जागतिक मूळ उपकरण विक्रीचे वरिष्‍ठ संचालक फ्रेड क्युसिमानो यांनी ‘ब्रिजस्‍टोन’च्या वतीने हा पुरस्‍कार स्‍वीकारला.  

जीएमचे जागतिक खरेदी आणि पुरवठा शृंखलचे वरिष्‍ठ उपाध्यक्ष स्‍टीव्ह कायफर म्‍हणाले, ‘खर्‍या अर्थाने सर्वोत्‍कृष्‍ट अशा पुरवठेदारांना सन्मानित करण्याची ही जनरल मोटर्ससाठी संधी आहे. वाहन उद्योगात अतिशय वेगाने कायापालट होत आहे. सध्या वाहनांच्या मजबूत उत्‍पादनांचा आणि भविष्‍यातील अत्‍याधुनिक सेवांचा पुरवठा यासाठी आमच्या पुरवठा आधाराशी असलेले संबंध अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.’

गुणवत्ता, अंमलबजावणी, नाविन्य आणि एकूण उद्यमाचा खर्च या कामगिरीचे मापदंड सांभाळणार्‍या पुरवठेदारांसाठी जीएमचा वार्षिक पुरवठादार पुरस्‍कार राखून ठेवलेला असतो. वाहनाचे सुटे भाग, पुरवठा शृंखला आणि लॉजिस्‍टिकस्‌, ग्राहक सेवा, विक्री-पश्चात सेवा आणि अप्रत्‍यक्ष सेवा या क्षेत्रांची उत्‍पादने आणि सेवा जीएमला पुरविणार्‍या कंपन्या पुरस्कार विजेत्‍यांचे प्रातिनिधित्‍व करतात.  

‘ब्रिजस्टोन कॉर्पोरेशन’विषयी :
टोकियोमध्ये मुख्यालय असलेली, ब्रिजस्टोन कॉर्पोरेशन, ही जगातील सर्वात मोठी टायर आणि रबर कंपनी आहे.  टायरच्या विविध उपयोगांबरोबरच, उद्योगिक रबर, रासायनिक उत्‍पादने आणि क्रीडा साहित्‍य अशी विविध प्रकारच्या उत्‍पादनेदेखील ही कंपनी करते. त्याची उत्पादने जगभरातील १५० देशांमध्ये आणि विभागांमध्ये विकली जातात.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link