Next
विरारमध्ये संयुक्त जयंती महोत्सव साजरा
मिलिंद जाधव
Friday, May 03, 2019 | 03:56 PM
15 0 0
Share this article:


विरार : विरार, नालासोपारा येथील भीमसैनिक रिक्षा चालक मालक यांच्या वतीने दोन मे २०१९ रोजी तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांचा संयुक्त जयंती महोत्सव विरार पूर्व येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापालिका तलाव मनवेल पाडा येथे साजरा करण्यात आला.


या निमित्ताने दिवसभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सकाळी बुद्ध पूजापाठ झाल्यानंतर श्रामनेर धम्मगुरू नितीन जाधव यांनी धम्मोपदेश केला. भिमकन्या प्राप्ती प्रमोद तांबे, भिमसैनिक रिक्षा चालक मालक संघटनचे अध्यक्ष बाळा पवार, संघटनेचे सल्लागार हर्षु जाधव यांचे प्रबोधनात्मक भाषण झाले. त्यानंतर संघटनेचे उप खजिनदार मिलिंद जाधव यांनी भाषण करून कविता सादर केल्या. संघटनेसाठी ज्या व्यक्तींनी योगदान दिले त्यांचा सत्कार सायंकाळी करण्यात आला. त्यानंतर भिक्खुणी एस.संघमित्रा यांच्या धम्मोपदेशाचा कार्यक्रम झाला. संघटनेकडून त्यांना धम्म दान करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.


ओशिवळे, राजापूर येथील गायक अनिल रिंगणेकर आणि पार्टी व मुंबईच्या गायिका शालिनी गवई यांचा भीम गीतांचा कार्यक्रम झाला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बाळा पवार यांनी भूषविले. स्वागताध्यक्ष म्हणून मनोज जाधव यांनी काम पहिले. सचिन मोहिते यांनी प्रास्ताविक केले. नितीन जाधव यांनी सूत्रसंचालन केले. 

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search